सांगली प्रतिनिधी : नवभारत शिक्षण मंडळ संचलित लेफ्ट. जन. एस पी पी थोरात अकॅडमी या शाखेचा जिमखाना डे 2026 हा सोहळा हजारो पालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या शाखेचा वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव रविवारी शांतिनिकेतन लोक विद्यापीठ परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शैक्षणिक विकासाबरोबरच सांस्कृतिक व कलाक्षेत्रातही मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने अल्प शैक्षणिक फी व मर्यादित वेळेमध्ये चालवण्यात येणारा प्रयोगशील शैक्षणिक उपक्रम म्हणून लेफ्ट. जन एस पी पी थोरात अकॅडमीकडे पाहिले जाते. परिसर व पंचक्रोशीतील अनेक मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय पालकांची मुले या शाखेमध्ये शिक्षण घेत आहेत . वर्षभरामध्ये या मुलांना विविध शैक्षणिक उपक्रमांसह सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील विविध प्रकारांचे ज्ञान करून दिले जाते. यासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेले तज्ञ मार्गदर्शक संस्थेमध्ये कार्यरत आहेत .वर्षभरात मुलांना शिकवलेल्या या सर्व विविध उपक्रमांचे सादरीकरण पालकांसमोर करण्यासाठी आयोजित जिमखाना डे अंतर्गत विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध क्रीडा प्रकारांचे सादरीकरण केले . प्रार्थना, सूर्यनमस्कार, योगा, ॲक्शन सॉंग, संचलन व स्कॉट ड्रिल ने सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर लेझीम, लाठी काठी, हॉर्स रायडिंग, रिक्वेस्टेरियन, कराटे, सेल्फ डिफेन्स, स्विमिंग, रायफल शूटिंग, रॅपलिंग, वॉल क्लाइंबिंग, कुस्ती, मल्लखांब, जिम्नास्टिक, ऑबस्टॅकल्स अशा विविध क्रीडा प्रकारांची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून पालकांची वाहवा मिळवली. दुपार सत्रात भारताच्या विविध राज्यांचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरणही मुलांनी उत्साहात केलं. संस्था संचालक गौतम पाटील व उपसंचालक डी.एस.माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यासाठी विजय बाजीराव देशमुख, नगरसेवक- माळशिरस नगरपंचायत, रणजितसिंह निंबाळकर- वकील, फलटण, महेश बाळासो मोहिते- सरचिटणीस सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी, सचिव मलकापूर तालुका सहकारी सेवा सोसायटी, वैशाली रामभाऊ पठारे , उद्योजिका प्राजक्ता धनराज पाठक, सुषमा बळीराम शिंदे रत्नागिरी पोलीस, राजेश नारायण डोरले कुंभारी (जत), शेगाव अर्बन बँक चेअरमन श्री सचिन जाधव या पालक प्रतिनिधींच्या उपस्थितीत हजारो पालकांसह विद्यार्थी, विद्यार्थिनी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहात उपस्थित होते.
लेफ्ट. जन. एस पी पी थोरात अकॅडमीचा जिमखाना डे सोहळा उत्साहात संपन्न
By -
मार्च २३, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या