तासगाव : तालुक्यातील चिंचणी येथील विठ्ठलराव पा विद्यामंदिर या हायस्कूलमध्ये एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उन्हात बसवून शिक्षक मंचकावर सावलीत बसले. याप्रकरणी गावातील पालक विजय पाटील यांनी आक्षेप नोंदवला. संस्थेकडे तक्रार केली. यावरून चिंचणी येथील सामाजिक कार्यकर्ते सुमित शिवणकर यांनी हायस्कूलची बदनामी करू नये असे आवाहन केले आहे.
नमस्कार मित्रांनो,
काल चिंचणीच्या वि. स. पागे विद्यालय ची पोस्ट वाचली. वाचून खूप वाईट वाटले. ज्या शाळेच्या अंगा, खांद्यावर आपण खेळलो, बागडलो आणि जीवनाचे धडे गिरवले. त्या शाळेबद्दल अशी बातमी वाचणे दुःखदायक आहे. मनाला चटका लावणारी ही बातमी आहे. मुळात कोणतीही शाळा किंवा शिक्षक हे विद्यार्थ्यांचे शत्रू नसतात. आपल्या पालकांच्या बरोबर कितीतरी वेळा उन्हात,फिरताना, चालताना, शेतात जाताना काम करताना दिसतात. त्यावेळी आपण एवढा विचार करतो का? शिक्षकांच्या कडून चुकून एखाद्या दिवशी मुलांना उन्हात बसवणे झालेली असेल. किंवा ते शिक्षक सावलीत बसलेली असतील, यात थोडीफार चूक असली तरी यासाठी संपूर्ण शाळेस वेठीस धरून शाळेला बदनाम करण्यात पॉईंट नाही. आपण या चुका शिक्षकांना वैयक्तिक भेटून ही सुधारणा करण्याबाबत सांगू शकतो. किंवा पालक म्हणून आपण एखादी अपेक्षा ही व्यक्त करू शकतो. पण शाळेचे असं कोणताही प्रकारे वाभाडे काढणे बरोबर नाही. शेवटी शिक्षक हे माणूसच आहेत देव नाहीत. शिक्षणमहर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी चिंचणी सारख्या पंचक्रोशी मध्ये शाळा स्थापन केली. आज पर्यंत आपण शाळेचा चढता आलेख नेहमी पाहत राहिलो .आज चिंचणी च्या शाळेतून बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी यशस्वी आहे. या शाळेचा आदर्श घेऊन, चिंचणी सारख्या छोट्याशा गावातील विद्यार्थी आमदार झाले, खासदार झाले,
महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्थेचा उपाध्यक्ष आहेत. कुणी शासनाच्या मोठ्या पदावर सरकारी अधिकारी, कुणी यशस्वी उद्योजक, प्रगतशील शेतकरी, यशस्वी राजकारणी होऊन आपल्या शाळेचे आपल्या गावाचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात यशस्वी केले. हा इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही. आज ही आपल्या चिंचणीच्या शाळांचा गुणवत्तेचा आलेख पाहिला तर विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थी अव्वल घडत आहेत. आणि पालक सुद्धा यामध्ये समाधानी आहे. आज बाहेर सगळीकडे चिंचणी च्या शाळा व शिक्षकांचा आदर्श घेतला जातो. म्हणूनच मित्रांनो आपण आपल्या गावचा आदर्श, आपल्या शाळेचा अभिमान बाळगला पाहिजे. जीवनात आपण कुठेही गेलो तर आपल्या आईचे आणि शाळेचे ऋण आपण फेडू शकणार नाही. गरज असेल तिथे आपण शाळेला सहकार्य करूया. एखादी उणीव भरून काढण्यासाठी प्रयत्नही करू या. मला आशा आहे की तुम्ही माझ्याशी सहमत असालच.
*टीप* : काही आवश्यक सुधारणा करावयाच्या असतील तर आपण जरूर शिक्षकांना भेटून सांगूया.
ही विनंती.
शेवटी शाळा आपली आहे.
आणि आपण शाळेचे आहोत.
शाळेचा माजी विद्यार्थी सुमित दशरथ शिवणकर (माळी)
दरम्यान काही पालकांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
कृतज्ञतेचा झरा आणि संस्कारांची शिदोरी: एक प्रभावी भाष्य
सुमित दशरथ शिवणकर यांनी लिहिलेली ही पोस्ट केवळ एक स्पष्टीकरण नसून ती आपल्या 'मातृसंस्थे'प्रती असलेल्या निष्ठेचे एक जिवंत उदाहरण आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या घटनेचे स्वरूप न तपासता नकारात्मकता पसरवण्याचे प्रमाण वाढले आहे, अशा काळात सुमितजींनी मांडलेली भूमिका अत्यंत संयमी आणि विचार करायला लावणारी आहे.
समीक्षणाचे मुख्य पैलू:
संस्थेप्रती असलेली आत्मीयता: लेखकाच्या लेखणीतून वि. स. पागे विद्यालयाबद्दलचा अभिमान ओसंडून वाहत आहे. "ज्या शाळेच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो, बागडलो..." हे वाक्य वाचताना शाळेच्या जुन्या आठवणी आणि त्या वास्तूशी असलेले आपले रक्ताचे नाते अधोरेखित होते.
शिक्षकांकडे पाहण्याचा मानवी दृष्टिकोन: शिक्षक हे देखील माणूसच आहेत, त्यांच्याकडून कळत-नकळत चूक होऊ शकते, ही मांडणी अत्यंत वस्तुनिष्ठ आहे. एखाद्या लहानशा चुकीसाठी संपूर्ण शाळेला आणि पर्यायाने शिक्षणाच्या पवित्र मंदिराला बदनाम करणे किती चुकीचे आहे, याचे मार्मिक विश्लेषण सुमितजींनी केले आहे.
ऐतिहासिक वारशाचे स्मरण: शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी पेरलेल्या विचारांची आणि या शाळेने घडवलेल्या थोर व्यक्तींची (आमदार, खासदार, अधिकारी) आठवण करून देणे, हे वाचकांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे. शाळेचा दैदिप्यमान इतिहास विसरून वर्तमानातील एखाद्या घटनेवरून टीका करणे हे कृतघ्नपणाचे लक्षण ठरले असते, जे सुमितजींनी टाळले आहे.
नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे: या पोस्टचा सर्वात सुंदर भाग म्हणजे शेवटची 'टीप'. तक्रार करण्यापेक्षा 'सुधारणा' सुचवण्यासाठी प्रत्यक्ष संवाद साधण्याचे आवाहन करणे, हे एका सुजाण नागरिकत्वाचे लक्षण आहे. "शाळा आपली आहे आणि आपण शाळेचे आहोत" हा विचार गावच्या एकोप्यासाठी अत्यंत गरजेचा आहे.
निष्कर्ष:
हे लेखन केवळ शाळेची पाठराखण करणारे नाही, तर ते समाजाला एक दिशा देणारे आहे. जेव्हा आपण आपल्या गावातील शिक्षण संस्थांचा आदर करतो, तेव्हाच येणारी पिढी संस्कारक्षम घडते. सुमित शिवणकर यांचे हे विचार चिंचणीच्याच नव्हे, तर प्रत्येक शाळेच्या माजी विद्यार्थ्यासाठी 'आदर्श आचारसंहिता' ठरावेत असेच आहेत.
-एक सुजाण पालक
दरम्यान हायस्कूलने विविध परिक्षांमध्ये मिळविलेले यश समाज माध्यमातून प्रसिद्ध होत आहे.
*श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर.*
*विठ्ठलराव पागे विद्यामंदिर चिंचणी. तालुका - तासगाव जिल्हा - सांगली.
*NMMS परीक्षा निकाल. 2025-2026*
एकूण बसलेले विद्यार्थी=72
*उत्तीर्ण झालेले विद्यार्थी=59
शाळेचा शेकडा निकाल= 81.94 %
1) विराज सुनील माळी OBC 148
2) उत्कर्ष महेशकुमार कोरट(Korte) OPEN143
3) निखिल सूर्यकांत शिंदे Open 137
4) उत्कर्ष रविराज घाटके open 135
5) संचिता सुनील पवार Open 132
6) श्रावणी अमोल माळी Open 131
7) वैदही विश्वास पाटील Open126
8) कार्तिकी सतीश गायकवाड OBC 126
9) करण उत्तम माने Open 125
10) आर्या सुशांत पाटील Open 120
11) सिद्धी देवदास महाडिक OBC 117
12) दिग्विजय अरविंद पाटील Open 117
13) सोहम अरुण जाधव Open 117
14) सुहाना शानुर मुलानी Obc 113
15) अपूर्व सोमनाथ बुधावले VJ A 113
16)वैभवी लीलाचंद खरात SC 112
17) अरमान सुहास कांबळे SC 109
18) शिवराज विजय पाटील Open 106
19) तनिष्का सुभाष माळी Obc 106
20) हरीश विनोद माने SC 105
21) कल्याणी बळीराम पाटील Open 105
22श्रावणी बबन माळी Obc 104
22 सिद्धी अतुल लुगडे Open 102
23) समीक्षा दत्तात्रय शेटे obc 101
24) वेदिका विजय माने
open 100
25) वेदिका प्रदीप भिसे Sc 100
*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आणि पालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
NMMS संस्था विभाग प्रमुख: * श्री.श्रीराम साळुंखे साहेब *
NMMS प्रमुख व मार्गदर्शक *:श्री.भोसले डी.आर (सर)
*मार्गदर्शक शिक्षक:श्री.मस्के ए.यू.,श्री.पाटील जे.एम., श्री.ठोंबरेएच.एस., श्री.दगडे ए.जी
🏆🏆🏆🏆🏆🏆
*शुभेच्छुक -:*
*मा. मुख्याध्यापक श्री . खोत एल एस.*
*सर्व NMMS परीक्षेस मार्गदर्शन करणारे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य,शिक्षक,माता पालक समिती,सरपंच व सदस्य व चिंचणी गावचे ग्रामस्थ.*
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या