सांगली: जागतिक जल दिनानिमित्त (२२ मार्च) कृष्णा नदीकाठी पाणी पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मात्र, यावेळी नदीत मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळून आल्याने नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत शासनाने तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, वारंवार येणाऱ्या महापुरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून पुर नियंत्रणासाठी प्रभावी नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचालीमुळे भविष्यात पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
या पार्श्वभूमीवर नदीचे पूजन करून नदीला साकडे घालण्यात आले. कार्यक्रमात अध्यक्ष अभिषेक दिवाण यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजन करण्यात आले.
नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपस्थितांकडून देण्यात आला.
या कार्यक्रमास प्रभाकर केंगार, सचिन सगरे, सर्जेराव पाटील, ओंकार दिवाण, गोपाल मर्दा, मोहन चोरमुले, कविता लीला राठी, प्रेमलता पंपालिया, शोभा पंपालिया, धारणा ओझा, अर्चना अग्रवाल, शांता लाहोटी, प्रा. राजकुमार मगदूम, पंकजकुमार जाधव, प्रा. प्रकाश केंगार, सोमनाथ पवार आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या