सांगली प्रतिनिधी : भोंदू बाबा अशोक खरात यांनी भोंदूगिरी करताना व महिलांचे शोषण करताना हिंदू धर्माचा हिंदू देवतांचा आडोसा घेऊन भोंदूगिरीकरून महिलाचे लैंगिक शोषण केलेले आहे. सर्व पक्षातल्या राजकीय नेत्यांनी भोंदू अशोक खरातची खरी सत्यता न पडताळता त्याच्या दरबारात हजेरी लावल्यामुळे त्याच प्रस्त वाढलं त्यामुळे गोरगरीब हिंदू लोक फसले गेले हिंदू महिला त्याच्या लैंगिक शोषणाला बळी पडल्या. अशोक खरात याने भोंदूगिरी करून मिळवलेल्या मालमत्तेवर सरकारने बुलडोजर फिरवून त्याची मालमत्ता उध्वस्त करावी. यामुळे भविष्यात दुसऱ्या भोंदू बाबाच्या हातून असे कृत्य घडणार नाही. तसेच त्याच्यावर मोकांतर्गत कारवाई करावी.
अशी मागणी हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे, जिल्हाध्यक्ष संजय जाधव, राजू जाधव, प्रकाश चव्हाण, प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, अरविंद येतनाळे, गजानन माने, दिग्विजय शिंदे, हरपित गौड, अनिकेत अंबरूळे, श्रीधर मिस्त्री, सुमित शिंगे आदी पदाधिकारी यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या