सांगली दि. २६ : प्रभू श्रीराम म्हणजे भारताची उर्जा, विश्वास, आधार, न्याय, त्याग, जीवन आणि शाश्वत मूल्यांचे निरंतर प्रतिक..!राष्ट्रीय ऐक्य, त्याग आणि संयमाची रामकथा सदैव शाश्वत निसर्ग चक्र आहे.
आज सांगलीचा कृष्णाकाठ आणि माई घाट रामनवमीच्या निमित्ताने ५१ फूटी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेसमोर ११ हजार १११ दिव्यांच्या झगमगाटात तेजाळून निघाले. डोळ्याचे पारणे फेडणारा दिपोत्सव सांगलीकरांच्या कौतुकाचा विषय झाला आहे. असे प्रतिपादन भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील यांनी केले. ते पृथ्वीराज पाटील फौंडेशन आयोजित व संस्कार भारती आणि ज्ञानमंथन संस्थांचे सहकार्य लाभलेल्या रामनवमी दिपोत्सव सोहळ्यात बोलत होते.
पृथ्वीराज म्हणाले, 'एक दिवा प्रभू श्रीरामासाठी या आमच्या आवाहनाला हजारो सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ५१ फूटी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेसमोर हजारो दिपज्योती प्रज्वलित केल्या. दिपोत्सव,
महाआरती, स्वरवैभवचे परेश पेठे आणि कलाकारांची रंगलेली रामभजन भक्तीगीतांची मैफल, आतिषबाजी आणि सहभागी जनसागरामुळे सांगलीने 'जय श्रीराम' अशा जयजयकारात रामभक्तीचा महापूर अनुभवला.
या दिपोत्सव सोहळ्यास दिपक केळकर व कोटणीस महाराज, माजी आमदार नितीनराजे शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रकाश बिरजे आणि सौ. भारतीताई दिगडे,सौ. नीताताई केळकर, नगरसेवक उदय बेलवलकर, अपर्णा शेटे,महिला मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष स्वातीताई खाडे यांचा पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिगंबर पुजारी नृसिंहवाडी, सौ. विजया पृथ्वीराज पाटील, विरेंद्रसिंह पाटील, वि. द. बर्वे, प्राजक्ता व सनी धोतरे, अजय व कीर्ती देशमुख,मा. नगरसेवक प्रकाश पाटील,रघुनाथ नार्वेकर, सुधीर काकोडकर, प्राचार्य ताम्हणकर, शितल सदलगे, महावीर पाटील, प्रा. एन.डी.बिरनाळे,प्रशांत देशमुख, प्रशांत अहिवळे,सुनील शिंदे, अजिंक्य मोहिते, आशिष चौधरी, श्रीमती रोहिणी शिवराज पाटील, सौ. प्रियांका ऋतुराज पाटील, सौ. आश्विनी गवारे पाटील, डॉ. राजेंद्र मेथे, प्राचार्य डॉ. प्रताप भोसले, गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या शाखांचे प्रमुख, स्टाफ व आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील रामभक्त मान्यवरांचा आणि सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील रामभक्तांचा सहभाग लक्षवेधी ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या