प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मुंबई :राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला नवी गती देणाऱ्या एसटी महामंडळाच्या ३००० अत्याधुनिक बसेसचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि जलद होणार आहे.
या बससेवेचे लोकार्पण मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार जी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच इतर मान्यवर मंत्री व आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे एसटी सेवेला नवी ऊर्जा मिळणार असून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासात मोठी सोय निर्माण होणार आहे. ग्रामीण ते शहरी भागांना अधिक सक्षमपणे जोडणारे हे पाऊल महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सार्वजनिक सेवेला अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रवासी-केंद्रित बनवण्याच्या दिशेने हा एक नवा टप्पा आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या