तासगाव : आज तासगावच्या नगराध्यक्ष मा. सौ,विजयाताई बाबासो पाटील यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून , हेल्पिंग हँड्स फाऊंडेशन तासगाव यांच्या माध्यमातून, तासगाव कन्या शाळेला सॅनिटरी नॅपकिन्स आणि स्वच्छता गृहासाठी आवश्यक साहित्य दिले . हेल्पिंग हँड्स फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात आणि त्याच उपक्रमांना प्रतिसाद देत समाजातील विविध लोक हेल्पिंग हँड्स फाउंडेशन वर विश्वास दाखवत मदत करतात. यावेळी विशेषतः, कोल्हापूरमधून राधा सावंत आणि संदीप कलीकते यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत सोबत सामाजिक कार्यकर्त्या गीता हसुरकर मॅडम यांच्या सहकार्याने कन्या शाळेला सॅनिटरी नॅपकिन आणि स्वच्छतागृहाचे साहित्य दिले . अशीच काही मदत आम्ही विविध शाळा, संस्था, गाव आणि स्वच्छतेच्या कार्यात, समाजाच्या आरोग्याच्या उन्नतीसाठी वापरतो. यामुळे मुलींना स्वच्छतेचे महत्त्व समजेल, आरोग्य चांगले राखता येईल, आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल.*
*यावेळी कार्यक्रमावेळी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सुरेखा शेंडगे मॅडम, मा. विशाल शिंदे नगरसेवक, अध्यक्ष हेल्पिंग हँड्स, मा.निलेश दीक्षित सर, सौ शुभांगी विशाल शिंदे, माजी विद्यार्थिनी सौ कोमल प्रशांत पाटील, पालक प्रतिनिधी सौ भाग्यश्री वजरिनकर, मा. मृणाल इंगळे मॅडम व शाळेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.*
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या