सांगली प्रतिनिधी : दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी खणभाग, नळबाग, फौजदार गल्ली, राजवाडा परिसरात पटवर्धन हायस्कूल येथे हिंदूंचे विराट संमेलन घेण्यात येणार आहे. यासाठी आज दिनांक रविवार 22 मार्च रोजी कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सदर बैठकीस राष्ट्रीय सेवक संघाचे अॅड. माधवराव कुलकर्णी सांगली नगर कार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. शंतनु लिमये यांनी विराट हिंदू धर्म संमेलन यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच सदर हिंदू संमेलन यशस्वी करण्यासाठी सकल हिंदू समाज, हिंदू एकता आंदोलन सांगली, वारकरी संप्रदाय, महिला वर्ग, भजनी मंडळ, हिंदुत्ववादी मंडळे, हिंदुत्ववादी कार्यकर्ते सदर मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, खानभाग, नळभाग, फौजदार गल्ली परिसरामध्ये हिंदू धर्मातील विविध हिंदू जातीचे लोक राहतात या लोकांनी जात विसरून हिंदू म्हणून एकत्र येऊन विराट हिंदूधर्म संमेलन यशस्वी करावे.
सदर हिंदू संमेलनात निळकंठ शिवयोगी शिवाचार्य धारेश्वर महाराज व अँड. हिंदूशेर गुरुराज रसाळ यांचे मार्गदर्शन होणार आहे.
सदर बैठकीस हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष संजय जाधव, प्रदीप निकम, श्री. अनिरुद्ध कुंभार, श्री. श्रीधर मिस्त्री, सौ. सायली पवार, श्री. गजानन मोरे, श्री. गजानन माने, श्री. दिग्विजय शिंदे, श्री. संजय निकम, सौ. सुनीता इनामदार, श्री. धनंजय चव्हाण,श्री.सुमित शिंगे, श्री.हरप्रीतसिंग गौड, श्री. निखिल सावंत, सौ. निकिता जाधव, सौ. रुपाली माने, श्री. अवधुत जाधव, श्री. सुरेश जाधव, श्री. राजाभाऊ मोहिते पाटील, श्री. धीरज कदम, श्री. सुरेश पवार, सौ. संगीता चव्हाण, श्री. सुरेश गरड व अन्य हिंदुत्ववादी बांधव, महिला उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या