सांगली, दि. ११ : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ तसेच आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांसाठी विशेष मोफत चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दि. ११ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता मुक्ता थिएटर SFC मेगा मॉल, सांगली येथे हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
महिलांच्या सन्मानासाठी आणि विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला ५५० हून अधिक विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींना आनंददायी, प्रेरणादायी आणि संस्मरणीय अनुभव देण्याचा हा छोटासा पण अर्थपूर्ण प्रयत्न असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
यावेळी अजिंक्यन वुमन फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. मंजिरीताई सुधीरदादा गाडगीळ यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाच्या बळावर महिलांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे आवाहन केले.
महिलांचा सन्मान, सशक्तीकरण आणि प्रोत्साहन यासाठी भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सदस्य योगिता राठोड, हेमलता मोरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, मंडलाध्यक्ष अमित देसाई, कृष्णा राठोड, संतोष सरगर, शुभम देसाई, शुभम चव्हाण, अथर्व माने, प्रशांत राठोड आदी मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या