सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा पहिला टप्पा १ शनिवार, दिनांक: १४ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे ईशिता मल्टिपर्पज हॉल बुधगाव येथे सकाळी १०:०० वाजल्यापासून या शिबिराचा शुभारंभ होणार असून, नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले आहे.
बुधगाव मंडल क्षेत्रातील बुधगाव, बिसुर, नांद्रे, वाजेगाव व खोतवाडी या गावातील सर्व नागरिकांना ‘प्रशासन जनतेच्या दारी’ या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या या अभियानांतर्गत महसूल, पुरवठा, आरोग्य, कृषी आणि समाजकल्याण विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना दाखल्यांसाठी किंवा अर्जांसाठी विविध कार्यालयांत हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी शिबिराचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.
शिबिरात होणारी प्रमुख कामे:
महसूल विभाग: जातीचे, उत्पन्नाचे व रहिवासी दाखले, ७/१२ व ८-अ मधील दुरुस्त्या, वारस नोंदी.
पुरवठा विभाग: नवीन रेशन कार्ड अर्ज, रेशन कार्डमधील नावे दुरुस्त करणे किंवा वाढवणे.
योजनांचा लाभ: संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मार्गदर्शन व अर्ज प्रक्रिया.
आरोग्य विभाग: आयुष्मान भारत कार्ड नोंदणी व मोफत आरोग्य तपासणी.
या शिबिरासाठी महसूल विभाग जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, उपविभागीय अधिकारी कार्यालय मिरज व अप्पर तहसील कार्यालय सांगली यांच्या वतीने सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, स्वतः आमदार सुधीरदादा गाडगीळ या शिबिरास भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. ज्या नागरिकांनी यापूर्वी अर्ज केले आहेत, त्यांना उद्या प्रत्यक्ष दाखले किंवा मंजुरी पत्रांचे वाटप केले जाण्याची शक्यता आहे. तरी मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या