प्रतिष्ठा न्यूज
हुपरी (जिल्हा कोल्हापूर) - हजारो हिंदूंची कत्तल करणारा, जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर करणारा, मंदिरांचा विध्वंस करणारा धर्मांध क्रूर टिपू सुलतान आमचा आदर्श कधीच असू शकत नाही. आपल्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा धर्मांधांकडून अवमान करणारी घटना घडली आहे, हे अत्यंत गंभीर आहे. बांगलादेशी घुसखोरी ही आपल्यासाठी मोठी समस्या असून कोल्हापूर परीक्षेत्रात कुठे बांगलादेशी घुसखोर रहात असल्यास तात्काळ पोलीस प्रशासनास कळवण्याची जबाबदारी प्रत्येक हिंदूंची आहे. या घटनांसह ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ यांसह अनेक समस्या आज हिंदूंसमोर आवासून उभ्या आहेत. त्यामुळे या सभेच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मासाठीच त्याग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मकार्य यांचा आदर्श ठेवून हिंदूंनी संघटिपणे धर्मकार्य करावे लागेल, असे असे आवाहन भाग्यनगर येथे श्रीराम युवा सेनेचे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह यांनी केले. ते १ मार्च या दिवशी हुपरी येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते.
या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीही मार्गदर्शन केले. या सभेसाठी ११ हजारपेक्षा अधिक हिंदूंनी उपस्थिती दाखवून हिंदूंच्या संघटिपणाचा अविष्कार दाखवून दिला. सभेसाठी महिलांची संख्या लक्षणीय होती आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’कायदा संमत करावी, अशी एकमुखी मागणी या निमित्ताने करण्यात आली. सामूहिक ‘वन्दे मातरम्’ने सभेची सांगता झाली! प्रारंभी शंखनादानंतर सद्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. सूत्रसंचालन श्री. चैतन्य तागडे यांनी केले. या सभेत हिंदूंनी विविध प्रसंगांमध्ये स्वरक्षण कसे करावे याची विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी सरकारकडे करावी लागेल !
या प्रसंगी आमदार टी. राजासिंह म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस टास्क फोर्स हवा आणि महिला-युवती यांना तक्रार करण्यासाठी स्वतंत्र क्रमांक असला पाहिजे. अनेक राज्यांमध्ये हिंदूंची कमी होणारी लोकसंख्या हा चिंतेचा विषय असून ‘जहां जहां हिंदू घटा, वहां वहां हिंदू कटा’, हेच आतापर्यंतच्या इतिहासात घडले आहे. त्यामुळे हिंदूंना आपले संख्याबळ आणि धर्मप्रेम दोन्ही वाढवावे लागेल. याचसमवेत ‘लोकसंख्या नियंत्रण’ कायदा लागू करावा, अशी मागणी आपल्याला सरकारकडे करावी लागेल. इराणवर अमेरिका-इस्रालयवर झालेल्या आक्रमणात इराणचे नेते अयातुल्लाह खामेनेई यांचा मृत्यू झाला असून त्या निमित्ताने एम्.आय.एम्.चे औवेसी, तसेच भारतातील धर्मांधांना दु:ख होत आहे. इराणमधील शासक मृत्यूमुखी पडल्यावर भारतातील काही लोकांना दु:ख होण्याचे कारण काय ? त्यांची निष्ठा नेमकी कुणापाशी आहे ?
हिंदुत्वनिष्ठांचे दमन होऊ नये म्हणून एक हिंदू म्हणून संघटित व्हावे लागेल ! - सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व हिंदुत्वनिष्ठांची निर्दोष मुक्तता केली. सत्य कितीही दडपले, तरी ते कायमस्वरूपी दडपले जाऊ शकत नाही, हे यातून पुन्हा सिद्ध झाले. आज कर्नाटक असो कि बंगाल, केरळ असो कि काश्मीर हिंदूंना दडपण्याचे प्रयत्न चालूच आहेत. भगवा हा आतंकवादाचे नाही, तर शौर्याचे प्रतिक आहे. भविष्यात हिंदुत्वनिष्ठांचे दमन होऊ नये; म्हणून आपल्याला जात-पात-पक्ष-संप्रदाय विसरून एक हिंदू म्हणून संघटित व्हावे लागेल. हिंदु राष्ट्र आणण्यासाठी आपल्याला संघर्षच करावा लागेल आणि त्यासाठीच ही सभा आहे. त्यामुळे यापुढील काळात आपल्याला या भूमीत रामराज्य आणण्यासाठी हिंदू म्हणून एकत्र यावेच लागेल !
भारताला केवळ बाह्य शत्रूकडून नाही, तर अंतर्गत शत्रूकडूनही अधिक धोका आहे. काही वर्षापूर्वी सैन्यदलप्रमुख बिपिन रावत यांनी भारताला अडीच मोर्चावर लढावे लागणार असल्याचे विधान केले होते. पाकिस्तान आणि चीनला सैन्य हाताळेल, पण देशांतर्गत असलेले ‘अर्बन नक्षलवादी’ आणि भारतद्रोही यांचा अर्धा मोर्चा आपल्याला सांभाळायचा आहे. हा अर्धा मोर्चा म्हणजे देशांतर्गत भारतद्रोही किंवा अर्बन नक्षलवादी ! कधी ही अर्धी आघाडी पुरोगामी म्हणून येते, तर कधी अंधश्रद्धा निर्मूलनवादी म्हणून, कधी पर्यावरणवादी म्हणून, तर कधी मानतावादी म्हणून कार्यरत असतात. बांगलादेशी घुसखोरांना बाहेर हाकलायची मागणी केली की, त्यांना मानवाधिकार आठवतात; पण याच देशाचे नागरिक असलेल्या काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी ते चकार शब्द काढत नाहीत. त्यासाठी आपल्याला या सर्वांचे षडयंत्र सातत्याने उघडे करावे लागेल !
आता ‘गजवा-ए-हिंद’ नव्हे, तर ‘भगवा-ए-हिंद’ची आवश्यकता आहे ! - सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
गाव आणि धर्माच्या रक्षणासाठी प्रत्येक गावात ‘ग्रामसुरक्षा दले’ स्थापन केली पाहिजेत. या दलांद्वारे बांगलादेशी घुसखोरमुक्त आणि हलालमुक्त गाव मोहिमेला गती दिली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पुढील पिढीला ज्ञात होण्यासाठी, तसेच परिसरातील युवा पिढीसमोर प्रेरणास्थान निर्माण होण्यासाठी हुपरी सूर्यतलाव येथे छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास प्रशासनाने समयमर्यादा ठरवली पाहिजे; कारण आजच्या तरुणांसमोर छत्रपती संभाजी महाराज हेच आदर्श असले पाहिजेत. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हुपरी शहरात अंबादेवीची पालखी दर्ग्यात नेण्याची चुकीची प्रथा तात्काळ बंद करून हिंदु धर्माचे पावित्र्य राखावे, असे आवाहन या सभेच्या निमित्ताने आम्ही करत आहोत. २०४७ पर्यंत ‘गजवा हिंद’ करण्याचे षडयंत्र चालू आहे. याला प्रत्युत्तर म्हणून हिंदूंनी जागरूक होऊन हिंदु राष्ट्राची मागणी केली आहे. त्यामुळे आता ‘गजवा-ए-हिंद’ नव्हे, तर ‘भगवा-ए-हिंद’ची आवश्यकता आहे !
तरुण पिढीला व्यसनाधिन करणारे ‘गांजा आणि ड्रग्ज’चे प्रमाण हुपरी आणि इचलकरंजी शहरात वाढत आहे. तरी हुपरी आणि इचलकरंजीला ‘ड्रग जिहाद’चा विळखा बसू देऊ नका; गांजा आणि अमली पदार्थ विक्रीविरुद्ध प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव हे आदरपूर्वकच घेतले गेले पाहिजे त्यामुळे ‘शिवाजी विद्यापीठ’ नाहीत, तर ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असाच आदरयुक्त उल्लेख होणे अनिवार्य आहे. लाखो क्रांतीकारकांना प्रेरणा देणार्या ‘वन्दे मारतम्’ला विरोध करणार्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी आम्ही या निमित्ताने करतो.
* उपस्थित मान्यवर - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. गजानन महाजनगुरुजी, कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, हुपरी येथील नगरसेविका सौ. ऋतुजा गोंधळी, सौ. नंदीनी कौंदाडे, सौ. अलका नाईकवाडे, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री श्री. पंढरीनाथ ठाणेकर, जिल्हा विशेष संपर्क प्रमुख श्री. संतोष हत्तीकर, राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. दत्ता पाटील, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे हातकणंगले तालुका संयोजक श्री. नितीन काकडे, श्री. शरद माळी, अखिल भारत हिंदू महासभेचे उपाध्यक्ष श्री. रमेश भोरे आणि शहरप्रमुख श्री. संजय पाटील, भाजपचे मंडलप्रमुख श्री. सुभाष गोटखिंडे, उद्योजक श्री. सतीश झांजगे, उद्योजक श्री. राजेश शेटे, ‘चांदी कारखानदार असोसिएशन’चे उपाध्यक्ष श्री. दिनकर ससे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, सेवाव्रत प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संभाजी(बंडा) साळुंखे, हिंदू एकताचे श्री. दिलीप भिवटे, ‘हिंदू जागरण मंच’चे श्री. ओम पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. भगवंतराव जांभळे, निळकंठ माने
*या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘घरच्या घरी करता येतील असे होमिओपॅथी उपचार’ या ग्रंथाचे, तसेच ‘दत्त’ या ग्रंथाच्या मराठी आणि ‘हिंदी’ भाषेतील ‘ऑनलाईन’ आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.*
*क्षणचित्रे*
१. संयुक्त कागलवेस यांच्या तीने श्री अंबामातेची प्रतिमा देऊन आमदार टी. राजा सिंह यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
२. ९ मार्च या दिवशी हुपरी येथील सुभाष चौक येथे सकाळी ११ वाजता ‘गांजा आणि ड्रग्ज’ अशा व्यसनाधीनतेच्या विरोधात आंदोलन घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले.
* हिंदुत्वाच्या कार्यासाठी विशेष योगदान देणार्या धर्मवीरांचा सत्कार - हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. नितीन काकडे, अधिवक्ता समीर मुद्गल, अधिवक्ता अतुल रेंदाळे, श्री. रमेश भोरे
* उपस्थित पक्ष-संघटना-संप्रदाय - स्वामी समर्थ संप्रदाय, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,अखिल भारत हिंदू महासभा, भाजप, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, आंतरराष्ट्रीय विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय बजरंग दल यांसह पंचक्रोशीतील विविध स्थानिक संघटना-संप्रदाय, तरुण मंडळे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या