प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : येथील मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे राष्ट्रीय छात्रसेना (NCC) कॅडेट्ससाठी आयोजित करण्यात आलेला प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अनेक कॅडेट्सना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल NCC ‘A’, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे या उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून ले . डॉ. जितेंद्र आर. भरमगोंडा यांनी उपस्थित राहून कॅडेट्सना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी NCC च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना विकसित होते, असे सांगितले.यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्सचा विशेष सत्कार करण्यात आला. कॅडेट्सनी परेड व विविध प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभद्रा जाधव यांनी केले, तर आभार विक्रांत गौंड यांनी मानले. या सोहळ्यास महापालिका स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक मोहन वाटवे, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या सोहळ्यासाठी माजी कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा आ. डॉ. सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, सुजित खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील व करुणा माने यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या