कराड,(प्रतिनिधी) दि. ३० मार्च २०२६ — श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज कराड येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. बी. एन. कालेकर (माजी प्राचार्य) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कठोर परिश्रम, शिस्त व सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. समारंभाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराडचे जनरल सेक्रेटरी मा. श्री.अल्ताफहुसेन मुल्ला साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्रगती साधावी, असे आवाहन केले. कार्यक्रमास मा. श्री. जयंत पांडुरंग पाटील (काका), अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट, कराड, विश्वस्त व सदस्य मा. श्री. अरुण पाटील (काका), तसेच मा. दिलीप भाऊ चव्हाण, प्राचार्य प्रो. (डॉ.) आर. आर. जाधव, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. एस. आर. सरोदे, उपप्राचार्य आर. ए. कांबळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. जे.यू.दीक्षित, पर्यवेक्षिका श्रीमती एस. एस. मधाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने उपस्थितांचे मन जिंकले. प्रास्ताविक व स्वागत प्रो. (डॉ.) एस. आर. सरोदे यांनी केले, तर प्रमुख अतिथी व अध्यक्षांचा परिचय प्रा. एस. एस. बोंगाळे यांनी करून दिला. प्राचार्य प्रो. (डॉ.) आर. आर. जाधव यांनी वार्षिक अहवाल सादर करताना महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीमती एन. एस. देसाई व प्रा. श्रीमती एस. डी. पाटील यांनी केले, तर आभार डॉ. एस. एस. लावंड यांनी मानले. समारंभाला शिक्षक, विद्यार्थी व पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वेणूताई चव्हाण कॉलेज कराड मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
By -
मार्च ३१, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या