प्रतिष्ठा न्यूज
ठाणे प्रतिनिधी : दिनांक २८मार्च २०२६ ला ठाणे टाइम्स प्रस्तुत/ब्लॅक अँड व्हाईट आयोजित स्वामिनी पुरस्कार सोहळा डोंबिवली येथे महिला दिनाचे औचित्य साधून आनंदात पार पडला.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, क्राईम पेट्रोल मालिकेतील अभिनेते श्री सतीश नायकोडीदां,हास्यजत्रा मधील नम्रता संभेराव यांची बहीण रेश्मा आवटे,तसेच दिग्दर्शिका आणि आंतरराष्ट्रीय लावणी अभिनेत्री विजया कदम तसेच गायक आणि आकाशवाणी कलाकार श्री.रघुनाथ फडके इ .अनेक मान्यवर उपस्थित होते.
अनिता कळसकर या समाजसेवेत कार्यरत असल्याने तसेच साहित्य क्षेत्रात ही त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे . आज अनिता ताई या नैसर्गिक पर्यावरण आणि मानवता विकास संस्था , महाराष्ट्र .ठाणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करतात २०२५ला त्यांनी आधारवाडी कारागृहात जवळपास ४०च्या पुढे झाडे लावली .तसेच ताईचे लिखाण अनेक दिवाळी अंकात तसेच वर्तमानपत्रात ही प्रसिद्ध होतात. राजकीय पार्शभूमिका असलेल्या अनिता ताई या प्रत्येक क्षेत्रात न डगमगता आपले कुटुंब सांभाळून काम करताना दिसतात .याचा त्यांचे हितचिंतकांना अतिशय आनंद होतो.
स्त्री कोणत्याही क्षेत्रात ज्यावेळी एकटी प्रवास करत असते तेव्हा अनेक अडचणींवर मात करतच तिला पुढे जावे लागते .अशा प्रत्येक अडथळा मात करत आजची स्री ची वाटचाल चालू आहे .अशा अनेक स्त्रियांचा सन्मान आज स्वामिनी पुरस्कार देऊन करण्यात आला .
या कार्यक्रमात अनिता कळसकर यांच्यासाठी एक आनंदाची बाब म्हणजे गायक आणि (जितेंद्र अभिषेकींचे शिष्य) आकाशवाणी कलाकार मा.श्री.रघुनाथ फडके यांच्या हस्ते त्यांना २०१९ला साहित्यिक आणि आदर्श शिक्षिका म्हणून एका फाऊंडेशनने पुरस्कार मिळालेला आहे .आजच्या दिवशी स्वामिनी हा पुरस्कार परत एकदा फडके सरांच्या हस्ते मिळाला ,याचा त्यांना मनोमन खूप आनंद झाला.
तसेच या कार्यक्रमात सिने अभिनेत्री व नृत्य दिग्दर्शिका ,आंतरराष्ट्रीय लावणी सम्राज्ञी सौ विजया कदम यांना अगदी जवळून भेटण्याचा योग आला अनिताताईंवर सगळ्या स्तरातून स्तुती सुमनांचा वर्षाव होतोय.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या