सांगली प्रतिनिधी : निसर्गाचा आनंद घेत सांगली जिल्ह्यातील दंडोबा, शुक्राचार्य,आष्टा,होनाई या सह्याद्रीच्या महादेव डोंगर रांगातील धार्मिक व निसर्ग रमणीय स्थळांसह ट्रेकिंगचा आनंद विद्यार्थ्यांनी घ्यावा,तसेच शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील शेवटचे टोक भूपाळगड (बानुरगड) प्रचितगड,शिराळा,बागणी मिरज,सांगली भुईकोटांचा, सिद्धेवाडी धबधबा, जिल्ह्यातील विविध भूरूपांचा शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा यासाठी श्रावण महिन्यात दर सोमवारी सकाळची शाळा सुरू करावी अशी मागणी शिक्षक संघटना समन्वय समितीचे सहसरचिटणीस शशिकांत पाटील यांनी केली होती. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे केली होती.*
सहसरचिटणीस सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समिती शशिकांत पाटील, अध्यक्ष महेश शरणाथे, उपाध्यक्ष दिवाणजी देशमुख, कार्याध्यक्ष संतोष कदम, सरचिटणीस सदाशिव वारे, प्रसिद्धीप्रमुख चंद्रशेखर क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली 17 संघटनांनी सुट्टी निश्चितीच्या बैठकीमध्ये श्रावण सोमवारी सकाळ सत्रात शाळेची मागणी केली होती.*
सर्व जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, अरविंद गावडे, प्रमोद काकडे, मुरलीधर दोडके, सुनील सूर्यवंशी, राजेंद्र कांबळे, परशुराम जाधव, मनोहर साबळे, रमेश पेटकर, अजय राक्षे, ज्ञानदेव भोसले यांनी केलेले आवाहनाला शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.*
श्रावण सोमवारातील निसर्ग, सांगली जिल्ह्यातील भुजैविक विविधता, स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रतिसरकार व शिवकालीन इतिहासाचा अभ्यास मुलांना व्हावा व मुलांचे बालपण वैचारिक दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या समृद्ध व्हावे, यासाठी शैक्षणिक मानसशास्त्राचा विचार करता सांगली जिल्ह्याची शैक्षणिक कमान शिक्षकांनी सातत्याने चढती ठेवलेली असल्याकारणाने शिक्षकांना सातत्याने काम करण्याची सर्वांगिकदृष्ट्या विद्यार्थी घडवण्याची ऊर्जा मिळावी यासाठी श्रावण सोमवारी सकाळ सत्रात शाळेची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केली होती.*
नुकतीच शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी सुट्ट्यांची यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध झाली. श्रावण सोमवारी शाळेची वेळ सकाळी 7.20 ते 11.45 अशी राहील. तसेच RTE act 2009 नुसार विहित मुदतीत सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्याची तसेच आवश्यक तासिका पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांची राहील,असे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी कळविले आहे.*
विशेषतः बालवयात विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास व्हावा व निसर्गाशी नाते जोडले जावे,यासाठी जिल्ह्यातून शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याची भूमिका घेऊन ती तडीस नेल्याबद्दल भूमिका घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील,सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शरणाथे यांच्या नेतृत्वाखाली 17 संघटनांच्या समन्वय समितीने केलेल्या पाठपुराव्याबाबत व शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांंच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
या निर्णयातून सांगली जिल्ह्यामध्ये भावी पिढीतून गिर्यारोहक, इतिहासप्रेमी विद्यार्थी-शिक्षक घडतील, ट्रेकिंग साठी पोषक वातावरण निर्मिती होऊन खेळाडू विद्यार्थी घडतील असे तासगाव पंचायत समिती क्रीडा शिक्षक वैभव आंबी व वैभव बंडगर यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या