प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:येथील श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय शैक्षणिक सहल व क्षेत्रभेटीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. इतिहास, संस्कृती, पर्यावरण आणि सामाजिक जाण यांचा प्रत्यक्ष अनुभव देणारी ही सहल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली.बी.एड. अभ्यासक्रमातील पर्यावरण अभ्यास विषयाच्या अनुषंगाने या सहलीचे नियोजन करण्यात आले होते. प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थी उत्साहात या सहलीत सहभागी झाले होते.सहलीची सुरुवात चाळीसगावजवळील पाटणा परिसरातील गौताळा अभयारण्यात असलेल्या चंडिका देवी (पाटणादेवी) मंदिराच्या भेटीने झाली. अर्धगोलाकार डोंगररांगांनी वेढलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी विद्यार्थ्यांनी मंदिराच्या हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा अभ्यास करत सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाची माहिती घेतली.यानंतर विद्यार्थ्यांनी वालझिरी येथे भेट देत महर्षी वाल्मिकी मंदिर, गोरक्षनाथ मंदिर, दत्त मंदिर आणि राम मंदिरांचे दर्शन घेतले. विविध धार्मिक स्थळांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील विविधता अनुभवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या