प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:हिंदुत्वाचा नव्याने जागर, हिंदू समाजाचा स्वाभिमान आणि हिंदू अस्मितेचा बुलंद आवाज उभारण्यासाठी तासगाव शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य “विराट हिंदू संमेलन” आयोजित करण्यात आले आहे.हिंदू संस्कृतीचे जागरण, धर्मावर होत असलेल्या विविध आक्रमणांना उत्तर, तसेच विकृत पद्धतीने धर्माचे सादरीकरण आणि समाजात वाढत चाललेली जातीय दरी या सर्व गंभीर मुद्द्यांवर एकत्र येऊन विचारमंथन करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.“धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल” या ठाम भूमिकेसह प्रत्येक हिंदू बांधवाने आणि राष्ट्रभक्तांनी या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हे संमेलन रविवार दि.२२ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेचार वाजता चंपाबेन वाडीलाल ज्ञान मंदिर प्रशालेच्या मैदानावर पार पडणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार असून, इस्कॉन मंदिर आरवडे यांच्या वतीने संकीर्तन, भक्तीगीत व विविध प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. त्यानंतर भारत माता, गोमाता आणि धर्मध्वज पूजन करून संमेलनाचा प्रारंभ होईल.यावेळी परमपूज्य दादा महाराज भाळवणीकर यांचे आशीर्वचन लाभणार आहे. पुढे “पंचपरिवर्तन” या विषयावर डॉ. प्रियदर्शन चितळे आणि सौ.कल्याणीताई गाडगीळ मार्गदर्शन करणार आहेत.पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप होणार असून, त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या भव्य संमेलनासाठी तासगावातील हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, हे संमेलन शहरात हिंदू एकतेचा नवा इतिहास घडवेल, असा विश्वास सकल हिंदू समाज समितीचे अध्यक्ष अवधूत गडकर यांनी व्यक्त केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या