प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज दि. २ पासून जिल्हाभरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले. तसेच दि. १० मार्चपासून सुरू होणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष श्री. संजयकुमार जी. गायकवाड व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे सांगली जिल्हा अध्यक्ष प्रविण देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रशासनाने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मागण्यांचा योग्य विचार केला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येणार असून प्रशासनाचे तारांबळा उडणार आहे.
यावेळी प्रशासनाला मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेतून ग्रामपंचायत
अधिकाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवताना दबावतंत्राचा वापर केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून धमकी व दडपशाहीचा वापर सुरु आहे. बैठकांमध्ये असभ्य भाषा वापरून मानसिक खच्चीकरण केले जात आहे, अशा दबावतंत्राखाली काम करणे आम्हाला शक्य नाही. यासंदर्भात वारंवार कल्पना देऊनही प्रशासनाच्या वर्तणुकीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळेच असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ग्रामपंचायत अधिकारी कामावर येतील, मात्र प्रशासनाला कोणताही अहवाल किंवा दैनंदिन माहिती देणार नाहीत असे संघटनेने म्हटले आहे.
ग्रामपंचायत अधिकारी कामच करत नाहीत असा प्रशासनाचा आक्षेप असेल, तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सांगली जिल्हा परिषद राज्यात अव्वल कशी आली? कामे प्रलंबित राहत असतील, तर ई-ऑफिस प्रणालीत जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक कसा मिळविला, असे प्रश्न उपस्थित करण्यत आले आहेत.
सांगलीत दि. १० मार्चपासून क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्या आहेत. मात्र वरिष्ठांकडून सातत्याने दबावतंत्र व धमक्या दिल्या जात असतील, तर खेळामुळे ताण कमी होणार नाही अशीही भूमिका ग्रामपंचायत अधिकारी संघाने घेतली आहे. यामुळेच क्रीडा स्पर्धांवर बहिष्काराचा टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
यावेळी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिकारी महासंघाचे पदाधिकारी श्री. सागर ता. मोकाशी (खराडे), सौ. शुभांगी प. भारती, श्री. आर. डी. शिंदे, उपाध्यक्ष श्री. आप्पासो वि. माळी, श्री. प्रताप ज्ञा. पुटुगडे, जिल्हा संघटक श्री. एस. आर. पाटील, श्री. संतोष वा. सपकाळ, श्री. विनय व. थोरवत, श्री. टी. पी. कांबळे, श्री. आर.एस. गंगातीरकर,
जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री. व्ही. ए. महाडीक, श्री. शिवाजी पाखरे, श्री. दत्तात्रय ना. गोसावी, श्री. सचिन सं. मोरे, सौ. शामबाला एस. कुंभार व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे पदाधिकारी सरचिटणीस दीपक इंगवले-देशमुख, राज्य उपाध्यक्ष आर डी पाटील, पदाधिकारी प्रवीण भिसे, प्रशांत कोळी, संपत माळी, पैगंबर नदाफ, किशोर माळी, उज्वला जाधव, राजेश ननवरे, धनश्री पाटील, विकास माने, सचिन पाटील, अमर वाटेगावकर, साजिद मुल्ला, सतीश जाधव, रवींद्र घाटगे, अधिकराव पाटील यांच्यासह पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या