प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:सर्वसामान्य नागरिक व शेतकरी बांधवांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी राज्य शासनामार्फत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१” राबविण्यात येत आहे.मार्च ते मे २०२६ या कालावधीत तासगाव तालुक्यात मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.या अभियानाचा उद्देश महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नव्या तरतुदींची जनजागृती,प्रभावी अंमलबजावणी तसेच डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर सुनिश्चित करणे हा आहे.महसूल प्रशासनाच्या माध्यमातून पारदर्शक,जलद आणि सुलभ सेवा देण्यावर भर देण्यात येणार आहे.
🗓️ शिबिरांचे वेळापत्रक
०७/०३/२०२६ – येळावी मंडळ
१४/०३/२०२६ – मनेराजुरी मंडळ
१०/०४/२०२६ – सावळज मंडळ
१७/०४/२०२६ – मांजर्ड मंडळ
०८/०५/२०२६ – विसापूर मंडळ
१५/०५/२०२६ – तासगाव मंडळ
२२/०५/२०२६ – वायफळे मंडळ
📌 शिबिरात उपलब्ध सेवा
लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध दाखल्यांचे वितरण,भूसंपादन प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके तयार करून दप्तर अद्ययावत करणे,सातबारा उताऱ्यातील त्रुटी दुरुस्त करून दुरुस्त सातबारा देणे
“जिवंत सातबारा” मोहिमेत वारस नोंदी,पात्र अ.पा.क., ए.कु.में., नजर गहाण आदी नोंदींबाबत कार्यवाही,
डिजिटल सातबाऱ्याच्या कायदेशीर वैधतेबाबत जनजागृती,अकृषक तरतुदीतील सुधारणांबाबत मार्गदर्शन,ई-मोजणी सेवा,अॅग्री स्टॅक नोंदणी,
पीएम किसान योजनेशी संबंधित कामे,तक्रार निवारण,
महसूल विभागाच्या विविध सेवांसाठी नागरिकांना कार्यालयीन फेरफटका मारण्याची गरज भासू नये,या उद्देशाने सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.तरी तासगाव तालुक्यातील सर्व नागरिक व शेतकरी बांधवांनी संबंधित मंडळ स्तरावरील शिबिरात उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन तहसील प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या