प्रतिष्ठा न्यूज
कल्याण प्रतिनिधी : पारिजात आयोजित मराठी भाषा गौरवदिन कथा अभिवाचन स्पर्धा २०२६ पार पडली ही स्पर्धा २ गटात पार पडली १गट ४थी ते ६ वी तसेच 2 रा गट ७ वी ते १० होता ही स्पर्धा किर्ती कॉलेज दादर ,मुंबई येथे पार पडली आपली शाळा नूतन ज्ञानमंदिर, कल्याण(पू) ला १हिल्या गटात नभा कनुजेइयत्ता ६ वी /अ हिस उत्कृष्ट वाचक चे पारितोषिक प्राप्त झाले तसचे यांची कथा साने गुरुजी लिखित श्याम ची आई पुस्तकातील मुकी फुले ही कथा होती.
२ ऱ्या गटात इयत्ता ८वी/अ मधील समीक्षा राठोड तसेच ९ वी /अ मधील सार्थक आव्हाड व तन्मय मोरे यांचा समावेश होता या स्पर्धेत यांनी प्रथम पारितोषिक मिळाले रोख 3000/-मानचिन्ह आणि प्रमापत्र याचा समावेश आहे की त्याच प्रमाणे या स्पर्धेस परीक्षक म्हणून श्री विनय मराठे व श्री निलेश माने लाभले होते तसेच स्पर्धेत मुंबईतून 60 शाळा सहभागी होत्या नूतन ज्ञानमंदिर शाळेचे विशेष कौतुक परीक्षक तसेच पारिजात संस्थेच्या सर्व सभासदांनी केले कारण गेली पाच वर्ष या स्पर्धेमध्ये नूतन ज्ञानमंदिर शाळा ही पारितोषिक पटकावित आहे. गेली ५वर्ष सौ सणस या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेत आहेत.
या स्पर्धेसाठी मार्गदर्शन तसेच भक्कम पाठिंबा शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर.टी. पाटील सर व शाळेच्या पर्यवेक्षिका सौ गरवारे मॅडम,सौ वसावे मॅडम यांच्या मार्गदर्शनाचा लाभ ही विद्यार्थ्यांना झाला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या