मिरज : येथे प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती तसेच बिझनेस हब पॉईंटच्या वर्धापन दिनानिमित्त दि. १९ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोफत शासकीय योजनांचा सप्ताह व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या सप्ताहात बांधकाम कामगार नोंदणी, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, नवीन मतदान नोंदणी व दुरुस्ती आदी सेवा बिझनेस हब पॉईंटच्या वतीने अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रभागातील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे वसीम बागवान यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अनेक इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
सदर सप्ताहाचा समारोप नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप कार्यक्रमाने करण्यात आला.
या कार्यक्रमास मा. प्रदीप कदम (अध्यक्ष, स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती, सांगली), मा. पद्माकर जगदाळे (शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सांगली), दिगंबर दादा जाधव (माजी नगरसेवक), मा. आरिफ भैया चौधरी (माजी नगरसेवक), मा. इम्रान गोलंदाज (युवा उद्योजक, आय जी कलर्स), मा. रियाज मुल्ला (युवा उद्योजक, एस एम डिजिटल), मा. उत्कर्ष खाडे (युवक प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र), मा. डॉ. महेशकुमार कांबळे, मा. तानाजी सातपुते (अध्यक्ष, शिवसेना, मिरज विधानसभा), मा. आकाश माने (युवक जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सांगली), मा. प्रशांत माने (जिल्हाध्यक्ष उद्योग सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सांगली), मा. शुभम पवार (पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सांगली), मा. मुजफ्फर सनदी (जिल्हाध्यक्ष बांधकाम कामगार सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सांगली), मा. सोहेल इनामदार (सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सांगली) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी संतोष हक्के, महेश साळुंखे, उल्लास लोंढे, कृणाल भोसले, स्वप्निल सौंदडे, आदर्श आवळे, इंजिनिअर मंथन कुदळे, महेश खाडे, अक्षय आवळे, सूरज म्हसकर, जयश्री म्हसकर, ज्योती शिंदे, रशीद मुजावर, आयेशा बैरागदार, ताराबाई कित्तुरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन स्वप्निल जाधव, रोहित पाटील, सचिन महिंद्रकर, अभिषेक कोलप, सलमान सनदी, अरुण सोनार, दिलावर मुलाणी, कय्यूम मणेर, जोहेब मुल्ला यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या