प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने तसेच जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या आदेशानुसार “छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर” कार्यक्रमांतर्गत गगनबावडा तालुक्यातील साळवण सजातील लाभार्थ्यांसाठी पहिले शिबिर शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी तिसंगी येथील महादेव हरी शिंदे महाविद्यालय च्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचा तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रुपाली सूर्यवंशी (तहसीलदार, गगनबावडा) यांनी केले आहे.
नियोजन बैठक पार पडली
निवडे साळवण येथे शिबिराच्या आयोजनासंदर्भात पंचक्रोशीतील सरपंच, पोलीस पाटील, महा-ई-सेवा केंद्र संचालक, महसूल कर्मचारी व नागरिकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत शिबिर यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन, नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविणे आणि प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याबाबत चर्चा करण्यात आली.
विविध कामांचा होणार निपटारा
नागरिकांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये खालीलप्रमाणे विविध विषयांवरील प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे –
⚫प्रलंबित फेरफार व अभिलेख दुरुस्ती
लोकसेवा हक्क प्रकरणे
⚫अकृषक जमिनीचा वापर परवानगी
⚫भूसंपादन विषयक प्रकरणे
⚫ई-पीक पाणी, ॲग्री स्टॅग, पीएम ⚫किसान नोंदणी व तक्रार निवारण
⚫भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीचे
वर्ग एकमध्ये रूपांतर
⚫‘जिवंत सातबारा’ मोहीम
⚫सामाजिक अर्थसहाय्य योजना
⚫तुकडेबंदी कायदा विषयक बाबी
⚫नोंदणीकृत व अनोंदणीकृत व्यवहार
शाळा दाखले, पानंद रस्ते, सर्वांसाठी
घर पट्टे
⚫रेशन कार्ड नोंदणी
⚫संजय गांधी निराधार योजना
⚫श्रावणबाळ वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
⚫महसूल व पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित इतर सर्व कामे
मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीस गगनबावडा तालुक्याच्या नूतन सभापती सौ. छाया प्रकाश देसाई, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, मंडळ अधिकारी विनय बोळके यांच्यासह विविध गावांचे सरपंच, पोलीस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदार सूर्यवंशी यांनी नागरिकांनी शिबिरास उपस्थित राहून आपल्या प्रलंबित कामांचा तत्काळ निपटारा करून घ्यावा, असे आवाहन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या