सांगली प्रतिनिधी : नवभारत शिक्षण मंडळ संचलित शांतिनिकेतन डे बोर्डिंग या शाखेचा जिमखाना डे 2026 हा सोहळा हजारो पालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या शाखेचा वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव रविवारी शांतिनिकेतन लोक विद्यापीठ परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शैक्षणिक विकासाबरोबरच सांस्कृतिक व कलाक्षेत्रातही मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने चालवण्यात येणारा प्रयोगशील शैक्षणिक उपक्रम म्हणून शांतिनिकेतन डे बोर्डिंग शाखेकडे पाहिले जाते. सांगली परिसरातील केवळ 19 विद्यार्थी संख्येने सुरू झालेल्या या शाखेमध्ये सध्या सुमारे 350 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत चालवल्या जाणाऱ्या या शाखेमध्ये शैक्षणिक उपक्रमांसह कला व क्रीडा उपक्रमांवर विशेष भर दिला जातो. यासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेले तज्ञ मार्गदर्शक संस्थेमध्ये कार्यरत आहेत .वर्षभरात मुलांना शिकवलेल्या या सर्व विविध उपक्रमांचे सादरीकरण पालकांसमोर करण्यासाठी आयोजित जिमखाना डे अंतर्गत विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध क्रीडा प्रकारांचे सादरीकरण केले . प्रार्थना, सूर्यनमस्कार, योगा, ॲक्शन सॉंग, संचलन व स्कॉट ड्रिल ने सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर लेझीम, लाठी काठी, हॉर्स रायडिंग, रिक्वेस्टेरियन, कराटे, सेल्फ डिफेन्स, स्विमिंग, रायफल शूटिंग, रॅपलिंग, वॉल क्लाइंबिंग, कुस्ती, मल्लखांब, जिम्नास्टिक, ऑबस्टॅकल्स अशा विविध क्रीडा प्रकारांची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांनी पालकांची वाहवा मिळवली. दुपार सत्रात भारताच्या विविध राज्यांचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरणही मुलांनी उत्साहात केलं. संस्था संचालक गौतम पाटील व उपसंचालक डी.एस.माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्याला मुंबई महानगर न्यायदंडाधिकारी ऋषिकेश पाटील, व्यावसायिक विश्वास पाटील, अनिल पारशेट्टी , सहाय्यक महसूल अधिकारी वनिता वाघमोडे डॉ. नंदिनी मालेदार, ॲड. शुभांगी मोरे या पालक प्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीसह हजारो पालक विद्यार्थी, विद्यार्थिनी , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहात उपस्थित होते.
शांतिनिकेतन डे बोर्डिंग या शाखेचा जिमखाना डे 2026 हा सोहळा उत्साहात
By -
मार्च २५, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या