प्रतिष्ठा न्यूज /योगेश रोकडे
सांगली : वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली यांच्या वतीने कै. प्रा. दिलीप देशपांडे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली ‘व्हिजन 2026 इनोव्हेंटा’ ही राज्यस्तरीय विज्ञान प्रकल्प स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली, एमटीडीके शैक्षणिक संकुल, मिरज, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान, सांगली आणि मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन प्रा. कै. दिलीप देशपांडे यांच्या पत्नी श्रीमती वसुधा दिलीप देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. राठोड, परीक्षक मंडळातील एस. पी. कुलकर्णी, डॉ. सतीश रामचंद्र, राजीव पुजारी, डॉ. मोहन माधव, डॉ. नरसिंग पडळ, डॉ. येडगे, डॉ. जाधव, डॉ. नेहा जोशी, प्रा. मयुरी देशपांडे, निमिष सुनील देशपांडे यांच्यासह एमटीडीके शैक्षणिक संकुलचे जनसंपर्क अधिकारी योगेश रोकडे, मेकॅनिकल विभाग प्रमुख सागर सपकाळ, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख मोहाळे, सहभागी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली होती. लहान गट (इयत्ता ५ वी ते ७ वी) मध्ये पर्वराज लट्टे यांनी प्रथम, मंदार कोळी द्वितीय, यशोधन पाटील तृतीय, गौरंग सहोत्रे चतुर्थ, मिहिर घाडगे पाचवा व वैष्णवी बागलकोटे सहावा क्रमांक पटकावला.
तर मोठा गट (इयत्ता ८ वी ते १० वी) मध्ये कुणाल माने व पार्थ जाधव यांनी प्रथम, अवनी ठाकूर व माधुरा पाटील द्वितीय, वेदांत चव्हाण तृतीय, सौम्या मराठे व पुपुल भोसले चतुर्थ, सौम्या नेने पाचवा तसेच साईराज पांडे व तन्मय बोडेकर यांनी सहावा क्रमांक मिळवला.
स्पर्धेसाठी प्रत्येक गटासाठी १०० विद्यार्थ्यांची प्रवेश मर्यादा ठेवण्यात आली होती. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, नवीकरणीय ऊर्जा तसेच नाविन्यपूर्ण विज्ञान उपकरणे या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले. स्पर्धेचे माध्यम मराठी, इंग्रजी व सेमी-इंग्रजी असे होते.
दोन्ही गटांसाठी स्वतंत्र पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांकासाठी ₹५०००, द्वितीय ₹३०००, तृतीय ₹२००० तसेच तीन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ₹१००० देण्यात आली. पारितोषिक वितरण एमटीडीके शैक्षणिक संकुलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या