प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना मालमत्ता कर, पाणीपट्टी व गाळाभाडे थकबाकीबाबत नगरपरिषद प्रशासनाने कडक इशारा दिला आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात 100 टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी विशेष वसुली पथकाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
ज्या मालमत्ताधारकांकडे घरपट्टी व पाणीपट्टी थकीत आहे, त्यांच्या विरोधात थेट कारवाई करण्यात येणार आहे.थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तत्काळ बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.शासनाच्या नवीन IWB संगणकीय प्रणालीअंतर्गत मागील थकबाकीवर दरमहा 2 टक्के दंड आकारणी सुरू झाली आहे.तसेच सन 2025-26 च्या चालू बिलावरही ऑक्टोबर महिन्यापासून प्रतिमहिना 2 टक्के दंड लागू करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकी वाढत जाणार असून नागरिकांनी तात्काळ कर भरणा करावा,असे आवाहन मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनी केले आहे.नगरपरिषद प्रशासनाने सर्व नागरिकांनी मालमत्ता कर,पाणीपट्टी व गाळाभाडे त्वरित भरून सहकार्य करावे,अन्यथा कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल,असा स्पष्ट इशारा दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या