प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पद्मभूषण स्व. डॉ. वसंतरावदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमीत्त वसंतदादा समाधीस्थळी, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना स्थळी, पी.व्ही.पी.आय. टी कॉलेज बुधगाव, तसेच सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे आदरांजली वाहण्यात आली.
प्रारंभी माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. प्रतिकदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे कमिटीचे उपाध्यक्ष तथा खासदार मा. विशालदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस सल्लागार समितीच्या सदस्या मा. श्रीमती शैलजाभाभी पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या उपाध्यक्षा मा. श्रीमती. जयश्रीवहिनी पाटील, सौ. पुजावहिनी पाटील यांचे हस्ते स्व. वसंतदादा पाटील यांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करणेत आले. व बाकीचे सर्व उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते सर्व उपस्थितांचे वतीने प्रा.डॉ. सिकंदर जमादार यांनी मनोगतपर अभिवादन केले.
यावेळी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे उपमहापौर गजानन मगदूम, विरोधी पक्ष नेता मंगेश चव्हाण, नगरसेवक हर्षवर्धन पाटील, संतोष पाटील, सांगली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक राजेश नाईक, सौ. सोनल पाटील, श्री. रमेश सर्जे, मिरज पंचायत समिती सदस्या तन्वी कमलेकर, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुजयनाना शिंदे, संचालक शशिकांत नागे, आनंदराव नलवडे, विष्णुअण्णा खरेदी विक्री संघ चेअरमन -संग्राम पाटील, सांगली वसंतदादा शेतकरी साखर कारखाना व्हा. चेअरमन बी.डी.पाटील, संचालक अमित पाटील, विशाल चौगुले, दौलतसिंह शिंदे, विशाल चंदुरकर, गणपतराव तात्या सावंत, दिनकरराव साळुंखे, शिवाजी कदम वसंतदादा कारखाना कार्यकारी संचालक संजय पाटील, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा करूणा सॅमसन, जिल्हा कॉंग्रेस सेवादलचे अध्यक्ष अजित ढोले, शहर जिल्हा कॉंग्रेस सेवादलचे अध्यक्ष पै. प्रकाश जगताप, सांगली जिल्हा दिशा समितीचे प्रा. दादासाहेब ढेरे, श्री. सुनिल गुळवणे, बीएसएनएल समितीचे दयाधन सोनवणे, सुभाष यादव, धनाजी पाटील कोकळे, रावसाहेब शिंदे वाघोली, बंडू पाटील, कवठेमहंकाळ, उत्तम पवार, कुंडल, गजानन साळुंखे, अनिल केसरे, अशोक माळी, सत्यजीत पाटील, विनायक कोळेकर, विशालदादा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय पाटील, प्रकाश कांबळे, राजेश एडके, प्रदीप मगदूम, सुहास पाटील, प्रदिप कार्वेकर, संदीप आडमुठे, गजानन मिरजे, लालसाब तांबोळी, भगवान शिवशरण, प्रमोद इनामदार, गंगाधर तोडकर, रोहन एडके, उज्वलसिंह शिंदे, श्रीनाथ देवकर, राजवर्धन जाधव, अल्लाबक्ष मुल्ला, पैगंबर शेख, श्रीमंत पांढरे, उदय बरगाले, अमित पाचोरे, मकरंद चिखले, मयुर बांगर, विलास गावंड, संजय कुलकर्णी, पंडीत पवार, श्रीहरी भस्मे, अविनाश शेटे, राहुल थोटे, शमाकांत आवटी, शिवराज पाटील, रोहित कबाडे, सुजित पवार, भिमराव चौगुले, नितीन दुबे, शशिकांत पवार सर्व उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना स्थळी खासदार विशालदादा पाटील, व्हा. चेअरमन बी.डी. पाटील, संचालक अमित पाटील, दौलतसिंह शिंदे, गणपतराव तात्या सावंत, दिनकरराव साळुंखे, विशाल चंदुरकर, शिवाजी कदम, तानाजी पाटील, संजय पाटील, अंकुश पाटील, उमेश मोहिते, गजानन खुजट, प्रल्हाद गडदे, अंजूम महात, दिलीप पाटील, कार्यकारी संचालक संजय पाटील, प्रकाश शेटे, राजाराम पाटील, विलास सर्जे, शमाकांत आवटी यांनी आदरांजली वाहिली. वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालय बुधगाव येथे रजिस्टार संदीप उमराणी, जयसिंह रजपूत, प्रा. बाजीराव पाटील सर, आणि कर्मचारी वृंद, विद्यार्थी यांनी आदरांजली वाहिली.
सांगली जिल्ह्याची काँग्रेस बळकट करणे हीच पद्मभूषण वसंतदादांना आदरांजली ठरेल - राजेश नाईक
सांगली जिल्हा काँग्रेस, शहर जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सहकार महर्षी पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रारंभी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक व नगरसेवक रमेश सर्जे यांच्या हस्ते पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी बोलताना शहर जिल्हा अध्यक्ष राजेश नाईक यांनी सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवण्याचे काम केले केले पाहिजे काँग्रेसअंतर्गत सर्व संघटना अत्यंत मजबूत करून काँग्रेसचा विचार प्रत्येक भागामध्ये पोहोचवून गेल्या बारा वर्षांमध्ये भाजप सरकारने जी दिशाभूल केली आहे त्याचा पर्दाफाश करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी आंदोलन करावे लागले तरी आपण ते करून काँग्रेस बळकट करणे व काँग्रेसचा बालेकिल्ला परत मिळवणे हीच स्वर्गीय पद्मभूषण वसंतदादा पाटील यांना आदरांजली ठरेल असे आपल्या मनोगत व्यक्त केले.
यावेळी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले प्रदेश काँग्रेसचे प्रमोद इनामदार, गंगाधर तोडकर, श्रीमंत पांढरे, सौ आशाताई पाटील, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा करूणा सॅमसन आपली मनोगते व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केले व शेवटी आभार विश्वास यादव यांनी मांनले यावेळी प्रदेश सेवादलाचे पैगंबर शेख, सौ. सुप्रिया तोडकर, मिनाक्षी दुग्गे, शमशाद नायकोडी, जन्नत नायकवडी हनुमान साबळे, बाहुबली कबाडगे, प्रतापराव चव्हाण, अख्तर अत्तार, स्वीय सहाय्यक संजय कुलकर्णी, अल्लाबक्ष मुल्ला, संतोष पाटील, बाबुराव पाटील भडकंबे, सुनील पाटील गुंडेवाडी, राजेंद्र कांबळे, नामदेव पठाडे, सुनील भिसे, बाबुराव माळी, प्रकाश बरडोल, उस्मान मगदूम, सुनील पाटील, अर्जुन सुतार, निमणी चे दादासाहेब पाटील, एडवोकेट सुधीर जाधव, नामदेव चव्हाण, मोहम्मद मुसा शेख, राहुल शिंदे, दीपक ताटे, सुरेश गायकवाड, मुफित कोळेकर, मुजावर, गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या