*आरोपींचे नांव पत्ता*
अटक ता. १४/०२/२०२६
१) असलम ऊर्फ टनटन मिट्टोरी खान, वय ६२ वर्षे, रा. ककलारा, ता-दातागंज, जि- बदायु, राज्य उत्तर प्रदेश.
२) शकील अकबर कुरेशी, वय ५४ वर्षे, रा. इस्लामनगर, ता- पटीयाली, जि. कासगंज, राज्य उत्तर प्रदेश.
अटक ता. २१/०१/२०२६
३) राहुल रंजमीश शर्मा, वय २७ वर्षे, व्यवसाय ज्वेलरी दुकान रा. गाव ककराला, ता. जि. बधायु, राज्य उत्तर प्रदेश.
४) विश्वजीत विजय पाटील, वय २४ वर्षे, व्यवसाय गलाई कामगार, रा. बांबवडे, ता- पलुस, जि. सांगली.
५) संकेत अरुण जाधव, वय २६ वर्षे, व्यवसाय कापड दुकान, रा. बलवडी, ता. खानापुर, जि. सांगली.
६) इजाज राजु आत्तार, वय ३० वर्षे, व्यवसाय पानपट्टी दुकान, रा. आमनापुर, ता. पलुस, जि. सांगली.
*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत*
दि. ०७/१/२०२६ रोजीचे सायकाळी १७.०० वा ते दि. ०८/०१/२०२६ रोजीचे सकाळी ०९.४५ वा चे पुर्वी. झरे ता. आटपाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील पाठीमागील खिडकीची काच फोडुन खिडकीचे गज गॅस कटरने कापुन आत प्रवेश करून लॉकर रुम मधील २२ लॉकर गॅस कटरने तोडुन ग्राहकांनी ठेवलेले सोने चांदीचे दागिने व पैसे चोरी करून घेवून गेले होते. सदर बाबत फिर्यादीनी आटपाडी पोलीस ठाणेस वरील प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरचा गुन्हा गंभीर असल्याने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर श्री. सुनिल फुलारी यांनी गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांनी सदर गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना सदर गुन्हयाच्या तपासाबाबत मार्गदर्शन करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्था. गु. अ. शाखा यांनी गुन्हा उघडकिस आणण्याच्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर व स्टाफ यांची पथक तयार केले होते.
सदर पथकाने आरोपी क्र. ३ चा शोध घेवून त्यास राज्य उत्तर प्रदेश व आरोपी क्र. ४ ते ६ यांना पलुस येथुन ताब्यात घेवून त्यांचेकडून ३ कोटी २५ लाख ५४ हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. सदर आरोपीकडे गुन्हयाच्या अनुशंगाने चौकशी केली असता, त्यांचे उत्तर प्रदेश येथील राहणारे अन्य साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली होती.
सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांचे पथक सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपीचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेणेकरीता वरिष्ठांच्या परवानगीने उत्तर प्रदेश व दिल्ली राज्यात रवाना झाले होते. सदर पथकाने उत्तर प्रदेश येथे जावून गोपनिय व तांत्रिक माहितीच्या आधारे निष्पन्न आरोपीबाबत माहिती काढत असताना संशयीत आरोपी १) मोहम्मद असलम ऊर्फ टणटण आणि २) शकील अकबर कुरेशी रा. कासगंज ता. ता-दातागंज, जि- बदायु, हे सिढपुरा ता. कासगंज, जि. पटीयाली राज्य उत्तर प्रदेश येथे असलेबाचत खात्रीशीर माहिती मिळाली.
त्याप्रमाणे सपोनि. जयदिप कळेकर यांचे पथकाने दि.१०/०२/२०२६ रोजी दोन्हीही संशयीत आरोपीस स्थानिक पोलीसांचे मदतीने सिढपुरा गावातुन छापा मारत शिताफीने ताब्यात घेतले. नमुद गुन्हयाचे अनुषंगाने सपोनि. जयदिप कळेकर यांनी त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा इतर साथीदारांसह केला असल्याची कबुली दिली. यावरुन सपोनि. जयदिप कळेकर यांनी १) असलम ऊर्फ टनटन मिठ्ठडोरी खान, वय ६२ वर्षे, रा. ककलारा, ता- दातागंज, जि- बदायु, राज्य उत्तर प्रदेश. २) शकील अकबर कुरेशी, वय ५४ वर्षे, रा. इस्लामनगर, ता- पटीयाली, जि. कासगंज, राज्य- उत्तर प्रदेश यांस नमुद गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेवून स्थानिक न्यायालयासमोर हजर करून मा. न्यायालयाने त्यांची ४ दिवस ट्रांझीट रिमांड घेवून सांगली येथे आरोपींना घेवून आले.
त्यानंतर आरोपी क्र. १ व २ यांना आटपाडी येथील मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोर्पीना दि. २१/२/२०२६ पर्यंत पोलीस करटडी रिमांड मंजुर केली आहे. सदर अटक आरोपीच्या इतर परागंदा साथीदारांची माहिती काढुन त्यांना अटक करीत आहोत.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली हे करीत आहेत.
*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्था. गु. अ. शाखा, सांगली, सहा पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर, स्था. गु. अ. शाखा, सांगली, पोहवा / संदीप नलावडे, सागर लवटे, संदीप गुरव, सागर टिंगरे, नागेश खरात, अनिल कोळेकर, अतुल माने, दरिया बंडगर, सोमनाथ गुंडे, रणजित जाधव, सतिश माने, मच्छिद्र बर्डे, उदयसिंह माळी, अमर नरळे, अरुण पाटील, अमिरशा फकीर,
पोशि / सुनिल जाधव, सुरज थोरात, विक्रम खोत, रोहन घस्ते, केरूबा चव्हाण, स्था. गु. अ. शाखा, सांगली, पोशि / अभिजीत पाटील, अजय पाटील, सायबर पोलीस ठाणे, सांगली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या