प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 16 : सांगली जिल्ह्यातील मोजणी प्रकरणांचा तातडीने व परिणामकारक निपटारा करण्याच्या उद्देशाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुरेखा सेठिया यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी आटपाडी तालुक्यात विशेष मोजणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील एकूण ७९ कर्मचारी यांनी आटपाडी तालुक्यातील २३ गावांमधील एकूण २२० मोजणी प्रकरणांमध्ये मोजणी काम एकाच दिवशी केले.
या विशेष मोहिमे अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज पार पाडले. या विशेष मोहिमेंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवून नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज पार पाडले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आटपाडी कार्यालयातील तसेच जिल्ह्यातील मोजणी प्रकरणांना गती देणे व तातडीने मोजणी प्रकरणा मधे कार्यवाही करणे हा होता.
शनिवार, दि. 14 फेब्रुवारी 2026 हा सुट्टीचा दिवस असतानाही जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आटपाडी तालुक्यातील मौजे विठ्ठलापूर, पुजारवाडी, खान्जोडवाडी, पिंपरी खु., गोमेवाडी, बनपुरी, निंबवडे, झरे, पारेकरवाडी, आटपाडी, दिघंची, पळसखेल, राजेवाडी, शेटफळे, देशमुखवाडी, खरसुंडी, कौठूळी, कानकात्रेवाडी, माडगुळे, लेंगरेवाडी, हिवतड, करगणी, तळेवाडी, अशा एकूण २३ गावांमध्ये प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेतल्या. या दौऱ्यादरम्यान एकाच दिवशी तब्बल २२० मोजणी प्रकरणांचे काम पूर्ण करण्यात आले. यामुळे नागरिकांच्या प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या निपटाऱ्यास महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे.
जिल्हास्तरावर प्रभावी समन्वय साधून मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा व तत्परतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित, समन्वयित आणि जबाबदारीपूर्ण प्रयत्नांमुळे हा दौरा यशस्वीरीत्या पार पडला.
हा विशेष मोजणी दौरा यशस्वी होण्यासाठी भूमी अभिलेख वाळवा विभागाचे उप अधीक्षक सुजाता माळी, आटपाडी उप अधीक्षक हर्षवर्धन डिग्गीकर, पलूस उप अधीक्षक उत्तुरकर, जत उप अधीक्षक श्री. देवकाते, कडेगाव उप अधीक्षक सतीश चव्हाण, शिराळा उप अधीक्षक शिरस्तेदार अनिल कांबळे तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी जहीर मुजावर, धनराज मोरे, श्री. मांडके यांनी महत्वपूर्ण भूमिका घेतली.
यापुढेही मोजणी प्रकरणांचा जलद, पारदर्शक व परिणामकारक निपटारा करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे संबंधित विभागाने कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या