सांगली प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शिक्षणासाठी शिक्षक कटिबद्ध असून दहा वर्षातून येणारी जनगणना व वेळोवेळी येणारी निवडणूक कामे शिक्षकांसाठी बंधनकारक आहेत.
तथापि बीएलओ (बूथ लेवल ऑफिसर) सारखी वर्षभर सातत्याने चालणारी व रविवार दिवशी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवावी लागणारी कामे यातून प्राथमिक शिक्षकांना पूर्णपणे वगळावे अशी मागणी नवनियुक्त जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडे समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शरणाथे सहसरचिटणीस शशिकांत पाटील संघाचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी केली.
महिला व बालकल्याण मंत्र्यांनी ज्याप्रमाणे अंगणवाडी सेविकांना पूर्णपणे या कामातून वगळण्यासाठी पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे पत्र शिक्षणमंत्र्यांनी मुख्यमंत्र्याकडे दिले असून माननीय मुख्यमंत्री स्तरावर वर्षभर चालणाऱ्या बी एल ओ कामातून प्राथमिक शिक्षकांना पूर्णपणे मुक्त करण्याचे प्रयत्न चालू असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान प्राथमिक शिक्षकांवर सध्या असलेला प्रचंड कामाचा ताण,शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम,विविध अशैक्षणिक कामांचा वाढता भडिमार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्ण वेळ देणे आवश्यक असताना त्यांना वर्षभर निवडणूकसंबंधी कामांमध्ये गुंतवले जात असल्याने शिक्षण व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सहसरचिटणीस सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समिती शशिकांत पाटील,अध्यक्ष महेश शरणाथे,उपाध्यक्ष दिवाणजी देशमुख,कार्याध्यक्ष संतोष कदम, सरचिटणीस सदाशिव वारे, प्रसिद्धीप्रमुख चंद्रशेखर क्षीरसागर जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, अरविंद गावडे, प्रमोद काकडे, मुरलीधर दोडके, सुनील सूर्यवंशी, राजेंद्र कांबळे, परशुराम जाधव, मनोहर साबळे, रमेश पेटकर, अजय राक्षे, ज्ञानदेव भोसले यांचा समावेश असलेल्या समन्वय समितीने स्पष्ट केले.
तत्पूर्वी जत पंचायत समितीच्या सभापती सौ अर्चनाताई नाथा पाटील यांचे पती नाथा (भाऊ) पाटील व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माननीय सुनील (भैय्या) पवार, सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शरणाथे, सहसरचिटणीस शशिकांत पाटील, संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, शिक्षक समितीचे माजी व्हॉइस चेअरमन राजाराम सावंत, मागासवर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जानकर, प्रोटांचे जत तालुकाध्यक्ष चंद्रकांत बंडगर, यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी श्री अजयकुमार नष्टे यांच्याशी बीएलओ गुन्हा विषयावर विस्तृत चर्चा होऊन यशस्वी तोडगा व सदर विषय संपुष्टात आणल्याचे सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समिती सहसरचिटणीस शशिकांत पाटील यांनी सांगितले
जत येथील BLO काम नाकारल्यामुळे दाखल गुन्हा जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करून सदर गुन्हा रद्द करण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हाधिकारी मैनाक घोष यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सांगली जिल्ह्यात नव्याने पदभार स्वीकारल्याबद्दल सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.
खासदार विशालदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले असून खासदार महोदयांनीही जिल्हा पोलीस प्रमुख व प्रांत जत यांना गुन्हा मागे घेण्याच्या आदेश दिले असल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या