तासगाव : आज मौजे सावर्डे (ता. तासगाव) येथे सोनाली सुधाकर माने हिच्या लग्नाचा आनंदोत्सव सुरू असतानाच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडत होत्या.
अक्षता पडल्यावर, सप्तपदी होण्याआधीच सोनालीने थेट मतदान केंद्र गाठून आपला मतदानाचा हक्क बजावला.
नववधूच्या वेषात मतदान करून तिने लोकशाहीप्रती आपली जबाबदारी दाखवून दिली.
लग्नाचा आनंद बाजूला ठेवून लोकशाहीप्रती कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या या नववधूच्या कृतीचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे. “मतदान हे प्रत्येक नागरिकाचे पवित्र कर्तव्य आहे” हा संदेश तिने आपल्या कृतीतून दिला असून, तरुण पिढीसाठी ही प्रेरणादायी बाब ठरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या