प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:दि तासगांव अर्बन को-ऑप. बँकेचा वर्धापन दिन शुक्रवार दि. ०६/०२/२०२६ रोजी थाटामाटात साजरा करणेत आला.वर्धापन दिन निमित्त बँकेच्या तासगांव शाखेमध्ये सत्यनारायण पुजा करणेत करणेत आली.या शुभ दिनी बँकेने सामाजीक बांधीलकी जपत सभासद,ग्राहक व तासगांव नगरीतील नागरीकांसाठी बँकेच्या प्रधान कार्यालय तासगांव येथे बँकेच्या वतीने लायन्स नॅब नेत्र रुग्नालय,मिरज यांचेमार्फत नेत्र तपासणी शिबीर आयोजीत करणेत आलेले होते.
या प्रसंगी तासगांव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. विजया पाटील,उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान,सभासद, संचालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.वर्धापन दिन व नेत्र तपासणी शिबीरास उपस्थित सर्व नागरीक, सभासद व ग्राहक यांचे संचालक विनय शेटे यांनी स्वागत केले व त्यांचे आभार व्यक्त केले.त्यानंतर मान्यवरांचे शुभ हस्ते दिप प्रज्वलन करणेत आले.बँकेचे अध्यक्ष कुमार शेटे यांनी उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की,बँकेच्या उपस्थित सर्व सभासद व ग्राहकांना बँकेच्या आर्थिक स्थिती बाबतची माहिती दिली.बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.बँकेने आपल्या ४५० कोटी व्यवसायाचा टप्पा पुर्ण केला असून बँकेचे ५०० कोटी व्यवसायाचे उद्दिष्ठ समोर ठेवून त्यानुसार बँकेची वाटचाल सुरु आहे.आपली बँक नेहमीच सामाजीक बांधीलकी जपत आलेली आहे.यातुनच आज सभासद व नागरीकांसाठी नेत्र तपासणी शिबीर आयोजीत केलेले आहे.या नेत्र तपासणी शिबीराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभघ्यावा असे आवाहन केले.तासगांव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.विजया पाटील व उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांनी बँकेच्या या उपक्रबांबाबत कौतुक केले व बँकेच्या ९१ व्या वर्धापन दिनास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नगराध्यक्षा सौ.विजया पाटील यांच्या शुभहस्ते नेत्र तपासणी शिबीराचे उद्घाटन करणेत येवून नेत्र तपासणीस सुरुवात करणेत आली.याचा असंख्य नागरीकांनी लाभ घेतला.या प्रसंगी बँकेचे चेअरमन कुमार शेटे, व्हा.चेअरमन अनिल कुत्ते,संचालक महेश्वर हिंगमिरे,सदाशिव शेटे,अरुण पाटिल,विनय शेटे,उदय वाटकर, धोंडीराम सावंत,रामशेठ शेटे,राजेंद्र माळी, सौरभ हिंगमिरे, उदय डफळापूरकर (सीए), अॅड. आशिष अडगळे, संचालीका श्रीमती सविता पैलवान, सौ.उमा हिंगमिरे, मॅनेजमेंट समिती सदस्य अवधूत गडकर, रविंद्र देवधर,. प्रदिप पवार बँकेंचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी व इतर मान्यवर तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या