प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : बस स्थानकात गर्दीमध्ये दागिने चोरी करणारी महिला आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी जेरबंद केले आहे. तिच्याकडून ३ लाख १२ हजार रुपये चा मुद्देमाल जप्त केला आहे. शारदा बंटी हतळणी, यय- ४०, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जिल्हा- कोल्हापूर असे जेरबंद केलेल्या महिलेचे नाव आहे.
*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी*
दि. ०१/०२/२०२६ रोजी खरसुंडी स्टँडवर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून फिर्यादीचे गळ्यातील मंगळसुत्र अज्ञात चोरट्याने चोरी केले होते. सदर घटने बाबत आटपाडी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन बस स्टॅन्डवर चोरी करणा-या संशयीत इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता सूचना दिल्या.
त्या अनुशंगाने दि. ०६/०२/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांचे पथकातील पोहेकों / हणमंत लोहार व पोकों / सुनिल जाधव यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली, महिला आरोपी नामे शारदा बंटी हतळणी, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर हिने खरसुंडी बस स्थानकावर मंगळसुत्र चोरी केली आहे.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे शारदा बंटी हतळणी, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जिल्हा- कोल्हापूर हिस चौकशीकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली येथील कार्यालयात चोलावून घेवून सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन व महिला पोकों/ मनिषा पवार यांनी तिचेकडे गुन्ह्यात चोरीस गेले मंगळसुत्राबाबत चौकशी केली असता, प्रथम तिने उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यानंतर तिस विश्वासात घेवून पुन्हा चौकशी केली असता, तिने खरसुंडी यस स्थानकावर पाच दिवसापूर्वी बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर तिचेकडे सदर दागिना हा कोठे आहे असे विचारता, तिने तिचे जवळच असलेली एक प्लास्टीक कॅरीबॅग दोन पंचासमक्ष काढून दिली.
लागलीच त्याचे कब्जातील सोन्याचा दागिना पुढील तपास कामी पोलीस सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्यन यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास फामी आटपाडी पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करीत आहेत.
*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन, स्था. गु. अ. शाखा, सांगली
पोहेको/ हणमंत लोहार, बसवराज शिरगुप्पी, संजय पाटील, उदय साळुंखे, मपोहेकों / प्रतिक्षा गुरव, दुर्गा कुमरे,
पोकों/ सुनिल जाधव, प्रमोद साखरपे, अभिजीत ठाणेकर स्था. गु. अ. शाखा, सांगली. चा. पो. कॉ/ कांबळे, मोटर परिवहन विभाग, पोलीस मुख्यालय, सांगली.
मपोकों / मनिषा पवार, नियंत्रण कक्ष, सांगली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या