प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:आज तासगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे टाटा टेक्नॉलॉजीजच्या कौशल्य विकास विभागाचे उपाध्यक्ष यांचे स्वागत आमदार रोहित पाटिल यांनी केले.यावेळी मनेराजुरी –योगेवाडी येथे साकारत असलेल्या प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या पार्श्वभूमीवर तासगाव शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात कौशल्य विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा,त्यांचा विकास व उभारणी याबाबत सखोल विचारविनिमय झाला.
यावेळी आगामी MIDC संदर्भात अत्यंत सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाली.औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून स्थानिक युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि उद्योगपूरक कौशल्ये उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.तासगाव व कवठे महांकाळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही औद्योगिक वसाहत ‘भाग्यरेषा’ ठरणार असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
शिक्षणासोबतच कौशल्यवृद्धी,रोजगारनिर्मिती आणि सक्षम समाजनिर्मिती हा विकासाचा मूलमंत्र असून, हा पाया अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.उद्योग–शिक्षण समन्वयातून परिसरातील युवकांसाठी उज्ज्वल भवितव्य घडविण्याचा निर्धार या चर्चेतून अधोरेखित झाला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या