प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणासाठी अत्यंत पूरक ठरणारा असून, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांनी केले.
खाडे शैक्षणिक संकुल, मिरज येथे केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ च्या प्रचार व प्रसार अभियानांतर्गत “अर्थसंकल्प २०२६ संमेलन” आयोजित करण्यात आले होते. भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्षा स्वातीताई खाडे यांच्या नेतृत्वाखाली या संमेलनाचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी स्वातीताई खाडे यांनी अर्थसंकल्पाची सविस्तर पार्श्वभूमी मांडत, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली सादर झालेल्या या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महिला, युवक, शेतकरी व सर्वसामान्य घटकांच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगितले.
या संमेलनात रुपालीताई गाढवे यांनी अर्थसंकल्पातील तरतुदी अत्यंत साध्या व सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. महिलांशी संबंधित विविध शासकीय योजना, आर्थिक सवलती व संधी यांची सविस्तर माहिती त्यांनी उपस्थित महिलांना दिली. या कार्यक्रमाला सुमारे १५०० पेक्षा अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ च्या प्रचार व प्रसारासाठी समितीची घोषणा करण्यात आली.
या समितीत स्वातीताई खाडे (अध्यक्ष), ज्योती कांबळे (संयोजिका), सारिका रोकडे (सहसंयोजिका – सोशल मीडिया), अनिता हारगे, कपीला पाटील, गंगुताई नाईक, ईशा साठ्ये, मनीषा सातपुते, ज्योती मगदूम, सारिका राहुटे आदी सदस्यांचा समावेश आहे.
तसेच या संमेलनास भाजपा ज्येष्ठ नेत्या सुमनताई खाडे, माजी महापौर संगीताताई खोत, रसिकाताई खाडे, नवनिर्वाचित महिला नगरसेविका योगिता राठोड, रोहिणी पाटील, उज्वला कांबळे, बानू जमादार, विद्याताई नलावडे, अपर्णा शेट, डॉ. जयश्रीताई पाटील (माई), थोरात ताई, सुस्मिता कुलकर्णी, साधना माळी, अनघा कुलकर्णी, गायत्री सातपुते, गीता खटावकर, हिना जमादार, कल्पना मस्के, माधुरी वसगडेकर, राजश्री कोरे आदी मान्यवर उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या