प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 8 : सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 61 निवडणूक विभाग व 10 पंचायत समितीच्या 122 निर्वाचन गणांसाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सरासरी 69.76 टक्के इतके मतदान झाले. या मतदानाची मतमोजणी सोमवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांमध्ये होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
मतमोजणीसाठी तालुकानिहाय टेबल संख्या व फेऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे. आटपाडी - 18 टेबल, 12 फेऱ्या, जत – 27 टेबल, 13 फेऱ्या, खानापूर – 16 टेबल, 9 फेऱ्या, कडेगाव – 16 टेबल, 11 फेऱ्या, तासगाव – 20 टेबल, 12 फेऱ्या, कवठेमहांकाळ – 16 टेबल, 9 फेऱ्या, पलूस – 14 टेबल, 9 फेऱ्या, वाळवा – 22 टेबल, 19 फेऱ्या, शिराळा – 20 टेबल, 9 फेऱ्या, मिरज – 22 टेबल, 19 फेऱ्या.
तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण पुढीलप्रमाणे – आटपाडी – पहिला मजला हॉल नवीन प्रशासकीय इमारत, तहसिलदार कार्यालय, आटपाडी. जत – जुने शासकीय धान्य गोदाम क्र. 2, नवीन प्रशासकीय इमारत, जत तहसिल कार्यालयाच्या समोर, जत. खानापूर – इनडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर (Indoor Sports facility centre), बळवंत कॉलेज विटा. कडेगाव – औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), कडेगाव, कराड कडेगाव रोड, कडेगाव. तासगाव – शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तासगाव, दत्तमाळ. कवठेमहांकाळ – पुरवठा शाखा समोरील मोकळी जागा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कवठेमहांकाळ. पलूस – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, दिवाणी न्यायालयाजवळ, पलूस. वाळवा – शासकीय धान्य गोदाम, बहे रोड, ईश्वरपूर. शिराळा – श्री गोरक्षनाथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिराळा. मिरज – शासकीय नवीन धान्य गोदाम, मिरज, वैरण बाजार, मिरज.
तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे -
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या