प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : परवाच्या दिवशी रात्री विश्रामबाग धामणी रस्त्यावर खून झाला होता आज भय व नशा मुक्त शहर व्हावे म्हणून स्थानिक नागरिकांनी विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये जाऊन ठिय्या दिला आणि निवेदन सादर केले आहे.
विश्रामबाग पोलीस स्टेशनचे निरीक्षक भालेराव साहेब यांनी गस्त वाढवणे अमली पदार्थाचे तस्करी रोखणे व गुन्हेगारांच्या वर कारवाई करण्याबाबत आश्वासन दिले आहे.
अखंड सांगली जिल्ह्यामध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत हळूहळू नागरिकांचा संयम सुटत चालला आहे.
पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील जिल्हा पोलीस प्रमुख असतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी असतील त्यांनी याबाबत तात्काळ कारवाई करून सदर प्रकार रोखावेत अन्यथा नागरिकांच्या आंदोलनाचा स्फोट होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
तानाजी सावंत, सतीश साखळकर, शंभूराज काटकर, उमेश देशमुख, रोहित कबाडे, लालू मिस्त्री यांच्यासह
भय व नशा मुक्त अभियान समिती सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या