प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल अँड ज्युनि. कॉलेज मिरज मध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली.
यावेळी शाळेच्या अधिक्षीका ख्रिस्टीना मार्टिन, मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोळी, सर्व शिक्षक, मान्यवर उपस्थित होते. झांझ व पालखीने मान्यवरांचे आगमन झाले. शिवप्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.सातवीतील विद्यार्थ्यांनी परिपाठ सादर केला त्यानंतर शिवगर्जना पोवाडे, शिवाजींची माहिती, नृत्य, नाटिका असे कार्यक्रम घेण्यात आले. आभार प्रदर्शन निकिता कांबळे, इयत्ता सातवीच्या वर्गशिक्षिका नाज शरीकमसलत व सुलभा पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा पार पाडली. कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक-चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील कॅम्पस कोऑर्डिनेटर डॉ. सतीश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या