प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)अंतर्गत तासगाव नगरपरिषद, तासगाव यांच्या माध्यमातून नवीन घरकुलांना प्रथम टप्प्यात मंजुरी देण्यात आली.या योजनेतील लाभार्थींना मंजूर निधीची पत्रे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली.या प्रसंगी तासगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.विजया पाटील,उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान,गटनेते सतीश लिंबळे,मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांच्यासह नगरसेवक व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक,अल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे,या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.तासगाव नगरपरिषदेमार्फत पात्र लाभार्थ्यांची छाननी करून प्रथम टप्प्यात घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी लाभार्थ्यांना शुभेच्छा देत शासनाच्या विविध आवास योजनांचा लाभ पात्र नागरिकांनी घ्यावा,असे आवाहन केले.घरकुल मंजुरीमुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून,शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या