प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सन २०२६ सालातील सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता दिनांक २६.०१.२०२६ रोजीपासुन सुरु झालेली असुन दिनांक ०७.०२.२०२६ रोजी मतदान व दिनांक ०९.०२.२०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.
सांगली सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होवु नये तसेच निवडणुक प्रकिया शांततेत पार पडावी याकरीता सांगली ग्रामीण पोलीस ठाणे रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या विरुध्द शरिराविरुध्द तसेच मालमत्तेविरुध्द गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच उपद्रव्यी इसम हे पोलीस ठाणे हददीत तसेच त्यांचे गुन्हेगारी कार्यक्षेत्रात वास्तव धोकादायक ठरु शकते याकरीता माननीय उपविभागीय दंडाधिकारी सोो मिरज यांनी सदर रेकॉर्डवरील गुन्हेगार व उपद्रव्यी इसमांच्या विरुध्द बंदी आदेश जारी केलेला आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हददीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तसेच उपद्रव्यी इसमांना निवडणुक कालावधीमध्ये मिरज तालुक्यातील कार्यक्षेत्राच्या हद्दीमध्ये प्रवेश बंदी (नो एंट्री) केलेल्या गुन्हेगारांची नावे खालीलप्रमाणे
१) संजय आनंदा सुतार रा. नांद्रे ता मिरज जि सांगली
२) अनिल रघुनाथ नलवडे रा. कवलापुर ता मिरज
३) जयराज ऊर्फ राजाराम साळुंखे रा. कवठेपिरान ता मिरज
४) अक्षय दिलीप शेटे रा इनामधामणी ता मिरज
५) मनोज माणिक पाटील रा. इनामधामणी ता मिरज
६) आशिष संजय केरीपाळे ऊर्फ पाटील रा. कवठेपिरान ता. मिरज,
७) सचिन बावासो चव्हाण ऊर्फ डिग्रजे रा. कवठेपिरान ता मिरज,
८) किरण हणमंत घस्ते रा. हरिपुर ता मिरज,
९) निलेश नरसु फाकडे रा. हरिपुर ता. मिरज,
१०) अमित उमाजी नाईक रा. कवलाई गल्ली, कवलापुर ता. मिरज,
वरील रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच उपद्रव्यी इसम दिनांक ०४.०२.२०२६ रोजीचे ००.०० वाजलेपासुन ते दिनांक ०९.०२.२०२६ रोजीचे २४.०० वाजेपर्यंत मिरज तालुक्यातील कार्यक्षेत्राच्या हद्दीमध्ये वास्तव व प्रवेश करण्यास बंदी करण्यात आलेली आहे तसेच सदर आदेशामध्ये दिनांक ०७.०२.२०२६ रोजी सकाळी ०९.०० वा ते दुपारी १२.०० या कालावधीत नमुद इसमांना मतदान करण्याबाबत मुभा देण्यात आलेली आहे.
सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुशंगाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १२६ प्रमाणे २४ गुन्हेगारांवर, कलम १२९ प्रमाणे ०७ गुन्हेगारांवर, कलम १६८ प्रमाणे ८९ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच बेकायदेशीर रित्या विनापरवाना दारुविक्री करणारे १३ इसमांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ड) प्रमाणे गुन्हे दाखल करून एकुण १११ लीटर ८६० मिली दारु अंदाजे किमत ३६०४०/- रुपयीची दारु जप्त करण्यात आलेली आहे. तसेच मा. जिल्हा अधिकारी साो सांगली यांचा बंदी आदेश लागु असताना एक इसम विनाकारण घातक शस्त्र कोयत्ता घेवुन फिरत असताना मिळुन आल्याने त्याच्यावर आर्म ॲक्ट कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई ही मा. श्री. संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, मा.श्रीमती कल्पना बारावकर मॅडम अपर पोलीस अधीक्षक सांगली व मा. श्री. प्रणील गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सांगली ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. बी. ए. तळेकर तसेच डी बी शाखेकडील अंमलदार सपोफौ मेघराज रुपकर बंडु पवार, पोहेकों अभिजीत पाटील, पोकों यासीन फकीर, पोकों हिमत शेख यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या