गगनबावडा : आनंदी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, गगनबावडा येथे दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी पद्मश्री डॉ. गो. जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, सातत्य व प्रामाणिक प्रयत्नांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमास ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. एच. एस. फरास, वरिष्ठ महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्रा. ए. एस. कांबळे, ग्रंथपाल सौ. वंदना इंगवले, प्रा. आर. आर. सरनोबत, प्रा. एस. एस. देसाई, प्रा. देवयानी पारगावकर, कु. रवीना कांबळे, श्री सचिन परीट व श्री अभिषेक कांबळे उपस्थित होते.
या सदिच्छा समारंभाचे यशस्वी नियोजन इयत्ता अकरावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई व सचिव डॉ. विद्या देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या वेळी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसन्न व उत्साही वातावरणात पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या