सांगली प्रतिनिधी : लग्न समारंभात बॅगेतील दागिने चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या सांगली शाखेस यश आले. त्याच्याकडून ४,०५,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिरासत फक्रुद्दीन शेख, वय २२ वर्षे, रा. मकान गल्ली, खणभाग, सांगली, असे जेरबंद करण्यात आलेल्या इसमाने नाव आहे.
*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी*,
दि. ०३/०२/२०२६ रोजी हुपरी गार्डन येथे लग्न समारंभात फिर्यादी यांचे पत्नीचे चॅगेतील सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. सदर बाचत सांगली ग्रामीण पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मंगलकार्यालयात चोरी करणा-या संशयीत इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता सूचना दिल्या.
त्या अनुशंगाने दि. ०४/०२/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील यांचे पथकातील पोना/ सुशिल मस्के, पोकों ऋतुराज होळकर आणि पोकों/ सुमित सुर्यवंशी यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली, रेकॉर्डवरील आरोपी नामे फिरासत शेख रा. खणभाग सांगली हा चोरीचे सोने विक्री करणेकरीता चिन्मय पार्कजवळील मदनभाऊ पाटील उदयानजवळ येणार आहे.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे चिन्मय पार्कजवळील मदनभाऊ पाटील उदयान परीसरात सापळा लावून निगराणी करीता असता एक इसम संशयीतरित्या धांधलेला दिसला, त्यावेळी पथकातील स्टाफने सदर इसम रेकॉर्डवरील आरोपी फिरासत शेख असल्याचे ओळखल्याने लागलीच पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील व पथकाने त्यास पळून जाणेची संधी न देता ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव फिरास्त फक्रुद्दीन शेख, वय २२ वर्षे, रा. मकान गल्ली, खणभाग, सांगली असे सांगितले. पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील यांनी त्यास मिळाले बातमीची हकीकत सांगुन त्याचे अंगझडतीचा उददेश फळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, पेंटचे खिशात वरील वर्णनाचे सोन्याचा दागिना मिळून आला. त्यास सदर दागिन्याचाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील यांनी फिरासत शेख यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता, त्याने सदरचा दागिना हा एक दिवसापूर्वी हुपरी गार्डन येथे लग्न समारंभाचे वेळी ठेवलेल्या बॅगेतून चोरला असून तो विक्री करणेकरीता निघाला असल्याची कबुली दिली.
लागलीच त्याचे कब्जातील सोन्याच्या दागिना पुढील तपास कामी पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे.
फिरासत शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेवर यापुर्वीही सांगली जिल्हयात लग्नसमारंमात चोरी केलेबाबतचे गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.
*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे,
मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारयकर यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्था, गु. अ. शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, जयदीप कळेकर, स्था. गु, अ. शाखा, सांगली पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहेकों / अतुल माने, पोना/ सुशिल मस्के, श्रीधर बागडी,
पोकों/ ऋतुराज होळकर, सुमित सुर्यवंशी, प्रमोद साखरपे, पोकों / अभिजीत पाटील, अजय पाटील, सायबर पोलीस ठाणे, सांगली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या