प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत भाजपा महिला मोर्चा सांगली यांच्या वतीने व जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. मिरज येथे आयोजित या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून संजय धामणगावकर यांनी “महिलांविषयी शिवरायांचे विचार” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी शिवरायांच्या राज्यकारभारातील स्त्रीसन्मान, स्त्रीसुरक्षा आणि महिलांना दिलेल्या अधिकारांविषयी उदाहरणांसह विवेचन केले. उपस्थित महिलांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व महिलांनी शिवरायांच्या आदर्शांचे अनुकरण करून समाजकार्य अधिक जोमाने करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमास नगरसेविका वैशाली गवळी, विद्याताई नलवडे तसेच महिला मोर्चाच्या पदाधिकारी अनिता हारगे, रूपाली देसाई, सारिका राहूटे, साधना माळी, गायत्री सातपुते, वर्षारानी वांडरे आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या