प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.२१ : आजच्या पिढीला, युवकांना व महिलांना स्वतःच्या अक्कलहुशारीने, कौशल्याचा उपयोग करुन प्रगती साध्य करता यावी यासाठी ना. नरेंद्रजी मोदी यांनी स्टार्ट अप वर भर देऊन भारताला आत्मनिर्भर करण्याचे कार्य हाती घेतले आहे. सांगली महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी स्टार्ट अप व नाविन्यता केंद्र उभे करावे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनात हे महत्वाचे आश्वासन आहे. सांगली ही नगरी नाट्यसंस्कृती, कला, साहित्य व लोककलेचा पाया आहे.उत्कृष्ट नाट्यगृह, पूरनियंत्रण व नागरी सुविधा उपलब्ध करण्याच्या योजना तडीस नेण्यासाठी नगरसेवक व पदाधिकारी आपले काम चोखपणे पार पाडतील. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी आज महापालिका पदाधिकारी व गटनेत्याचा सत्कार आयोजित करुन त्यांना सांगलीच्या विकासासाठी प्रोत्साहन दिले आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. आशिष शेलार यांनी केले. ते आज गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलातर्फे महापौर, उपमहापौर व गटनेता सत्कार समारंभात बोलत होते.
प्रारंभी स्व. गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन ना. शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत आणि प्रास्ताविकात संस्थापक चेअरमन मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी स्व. गुलाबराव पाटील यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेटाने चालवण्यासाठी स्व. गुलाबराव पाटील यांच्या नावाने सुरु असलेल्या शैक्षणिक संकुलात पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक इंग्रजी माध्यम शाळा,वैद्यकीय, औषधनिर्माण,डी. एड. बी.एड व नर्सिंग काॅलेजीस मधून हजारो विद्यार्थी घडत आहेत. आमच्या शैक्षणिक संकुलातील बहुजन समाजातील लेकरांना सामर्थ्य देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी ना. शेलार यांचा सत्कार केला. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे रचनात्मक कार्य पाहून ना. शेलार यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी उपमहापौर गजानन मगदूम, गटनेते संदीप आवटी व आटपाडीचे नगराध्यक्ष यू. टी. जाधव यांचा सत्कार ना. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले तर आभार प्राचार्या डॉ. राजेंद्र मेथे यांनी मानले.
यावेळी अजित जाधव, आटपाडी, अर्चना धुमाळ, तहसिलदार, वैभव गुरव, अजय देशमुख, सनी धोतरे, अॅड. अल्लाबक्ष काझी,मोहन वाटवे, अथर्व कुलकर्णी, महावीर पाटील नांद्रे, शितल पाटोळे,अभिजित परीट, हणमंत सरगर, आयुब निशानदार, प्रशांत देशमुख, आशिष चौधरी, डॉ. राजेंद्र मेथे, डॉ. सतिश पाटील, डॉ. बिभीषण कराळे, डॉ. आकांक्षा जोशी, विनय डोंगरे, ख्रिस्टीना मार्टीन, श्रीदेवी कुल्लोळी, साहेबलाल शरीकमसलत आदि मान्यवर व गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचा स्टाफ उपस्थित होता.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या