प्रतिष्ठा न्यूज
कागल प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने महाराष्ट्रातील विधानसभा व विधान परिषद सदस्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे तसेच विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे.
या उपक्रमाअंतर्गत कागल-गडहिंग्लज-उतूर मतदारसंघाचे आमदार तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा भेट देण्यात आला. यावेळी बार्टीच्या दिनदर्शिका व घडीपत्रिकांचे वितरण करण्यात आले तसेच बार्टी आणि सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास समतादूत किरण चौगुले, आशा रावण, तेजस चौगुले गोरंबेकर आदी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे लोकप्रतिनिधींमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अधिक व्यापक स्तरावर समाजापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या