प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : यावर्षी शनिवारी २१ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे आपल्या सांगलीचा अनमोल ठेवा असलेला गणेशदुर्ग स्वच्छता मोहीम सांगली जिल्हाधिकारी अशोकराव काकडे साहेब, सांगली संस्थानचे
युवराज आदित्यराजे पटवर्धन, सांगली गणपती पंचायतनचे व्यवस्थापक श्री जयदीपजी अभ्यंकर, सा.मि.कु. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे साहेब,टाकळी तपोवन मठाचे शिवदेव स्वामीजी, नगरसेवक बाळासाहेब बेलवलकर व कोल्हापूर जि. प. सदस्य प्रशांत शहापूरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी गणेश दुर्ग येथील दोन्ही बुरुज व बाजूचा परिसर यांची स्वच्छता करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात कचरा मुक्त गडकोटची शपथ घेऊन झाली. यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी स्वतः हातामध्ये खराटा, कोयता, खोरे व कुदळ इ.स्वच्छतेचे साहित्य घेऊन सहभाग घेतला.
यावेळी आपले लोकप्रिय जिल्हाधिकारी अशोक राव काकडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने आपले गडकोट किल्ले जसे स्वच्छ व बळकट ठेवले होते तसेच आपण किल्ले स्वच्छ व बळकट ठेवावेत यासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने पुढाकार घेतला यासाठी संघटनेचे आभार मानले. तसेच सांगलीच्या गणेश दुर्ग या किल्ल्याचे सुशोभीकरण व संवर्धन करून आपला सामाजिक वारसा जपण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांगली जिल्ह्बायातील बारा गडकोटांचे संवर्धन ही आम्ही तेथील सामाजिक संस्थांच्या सोबत करणार आहोत.
सांगली संस्थानचे युवराज आदित्य राजे पटवर्धन यांनी आपल्या गणेश दुर्ग च्या सुशोभीकरणासाठी अनेक नवीन उपक्रम राबविण्यात येतील अशी ग्वाही दिली.
यावेळी टाकळी तपोवन मठाचे शिवदेव स्वामीजी म्हणाले,
जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपण स्वतःला हिंदू म्हणू शकलो नसतो. आपल्या पुढच्या पिढीला आपल्या पूर्वजांचा इतिहास कळावा तसेच त्यांच्या पराक्रमामुळे जीवंत राहिलेले गडकोट किल्ल्यांची माहीती आपल्या पुढील पिढीला मिळवी म्हणून सुरू केलेली ही मोहीम उल्लेखनीय आहे त्यासाठी आपले जिल्हाधिकारी अशोकराव काकडे सर त्यांचे देखील त्यांनी आभार मानले.
श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष श्री नितीनदादा चौगुले यांनी सांगलीकरांना सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची मोहीम आम्ही राबवणार आहोत असे सांगितले.
यावेळी नुकतेच जि.प.निवडणुकीत निवडून आलेल्या प्रशांत शहापुरे यांचा सत्कार करण्यात आला. या मोहिमेमध्ये
सा.मि.कु. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे साहेब व मनपा चे कर्मचारी तसेच सांगली पंचायतन संस्थानचे सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी सागर राजपूत, विक्रांत कोळी, संदीप जाधव, रामभाऊ जाधव, आनंदराव चव्हाण तात्या, मोहन शिंदे, सुमीत साळुंखे, अनुराधा साळुंखे, राकेश दोड्डण्णावार, सचिन मोहिते, पप्पू गुरव, संदीप माळी, जयदीप सदामते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या