प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : कीर्तनाच्या माध्यमातून जनतेला स्वच्छता, शिक्षण, मानवता धर्माचा उपदेश देणारे आणि अंधश्रद्धा, अनिष्ट रूढीच्या विरोधात जनजागृती करणारे कीर्तनकार, समाजसुधारक, राष्ट्र संत गाडगे बाबा महाराज यांची 150 वी जयंती मिरजेत साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबा महाराजांच्या अस्थी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव मिरजेतील परीट गल्ली मधील संत गाडगेबाबा महाराज मंदिरात आहेत. मिरज मधील या मंदिरामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन करण्यात आले. या मंदिरामध्ये नियमितपणे भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलं जाते.
शिवसेनेचे महापालिका क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे सर, उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेवक सागर वनखंडे, राष्ट्रवादीचे नेते जुबेर चौधरी, विनायक यादव, धनंजय कदम, महेश निकम,किशोर रसाळ, यशवंत यादव, अशोक शिंदे, अनिल नेमाडे, बजरंग नेमाडे, श्री पवार सर, सौ सुषमा सूर्यकांत निकम, सौ प्रतिमा यशवंत यादव, सौ उषा दत्तात्रय यादव, शारदा संजय जगते यांच्यासहित परिट समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यामध्ये महान कार्य केलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या नावाने समाज मंदिर उभारण्यासाठी पाठपुरावा केला जाईल अस आश्वासन शिवसेनेचे महापालिका क्षेत्र प्रमुख मोहन मोहन वनखंडे सर यांनी यावेळी दिले. तर सदर समाज मंदिरासाठी महापालिकेकडून सुद्धा योग्य ते सहकार्य केले जाईल असे उपायुक्त स्मृती पाटील यांनी यावेळी सांगितले.
"देव दगडात नसून माणसांत आहे" हे सांगून राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांनी अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, जातिभेद आणि प्राण्यांची हत्या नाकारली. त्यांनी साधे राहणे, चोरी न करणे, व्यसनांपासून दूर राहणे आणि मुला-मुलींना शाळेत पाठवण्याचा (शिक्षण) मोलाचा संदेश दिला. संत गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या