प्रतिष्ठा न्यूज
सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाच्या विश्वस्त मंडळाची बैठक काल सायंकाळी सोलापूर येथील मयूरबन हॉटेल येथे पार पडली. या बैठकीत मराठा समाज विकास व प्रबोधन विषयक विविध उपक्रमांची चर्चा झाली. नुकत्याच झालेल्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या मराठा समाजाच्या नगरसेवकांचा सत्कार करण्यासाठी विशेष सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माऊली पवार व शारदभाऊ ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीस माझ्यासह ॲड. गणेश देशमुख सर, श्रीमती नलिनीताई जगताप, किसनराव दाडगे, निळकंठ वाघचौरे, दत्तामामा मुळे,राजू सुपाते हे विश्वस्त उपस्थित होते. सौ. उत्तरा बचूटे- बरडे या विश्वस्त बैठकीत ऑनलाईन सहभागी झाल्या.
*- राजा माने*
सोलापूर जिल्हा सकल मराठा समाज विश्वस्तांची बैठक ; नवनिर्वाचित मराठा महापालिका नगरसेवकांचा सत्कार होणार
By -
फेब्रुवारी १२, २०२६
0
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या