प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली महापालिका क्षेत्रामध्ये 25 हजारहून अधिक भटकी कुत्रे असून या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. जनतेमध्ये या भटक्या कुत्र्यांच्या विरोधात अतिशय चीड असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सांगली महापालिकेने भटक्या कुत्र्यांना कोंडून ठेवण्यासाठी निवाराग्रह बांधण्यासाठी 2.51 कोटीचा प्रस्ताव तयार केलेला आहे. पण डॉग पॉड व डॉग शेल्टर बांधण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसे नाहीत असे आयुक्तानी सांगितले असता हिंदू एकता आंदोलनाने प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना डीपीडीसीतून पैसे मंजूर करून द्यावेत असे निवेदन दिले व सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्याना निवारागृह तयार करण्याचे आदेश दिले आहेत याची सुद्धा आठवण पालकमंत्र्यांना करून दिली.
तरी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या केलेल्या मागणीनुसार सांगली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगलीवाडी हद्दीमध्ये एक एकर जागे मध्ये डॉग पॉड व डॉग शेल्टर साठी 2.51 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.
*यावेळी सांगली महापालिकेच्या आयुक्त सत्यम गांधी यांनी हिंदू एकताआंदोलनाचे प्रदेशातील माजी आमदार नितीन शिंदे यांना सांगितले की,* तुमच्या पाठपुराव्यामुळे ही तरतूद झालेली असून लवकरात लवकर निविदा काढून पावसाळ्या पूर्वी डॉग पॉड व डॉग शेल्टर उभा करणार.
यासाठी हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव,पै. प्रदीप निकम, मनोज साळुंखे शहर उपाध्यक्ष अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, अनिकेत अंबरूळे, अरविंद यतनाळे, दिग्विजय शिंदे, अनिकेत कुंभार, गावभाग विभाग अध्यक्ष गजानन माने आदीनी पुढाकार घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या