प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आपल्या सर्वांचे आदर्श, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा जागर करण्यासाठी राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या निबंध स्पर्धेचा छत्रपती शिवाजी महाराज असा विषय आहे.
या राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक एक लाख रुपयांचे असून यामध्ये पंचवीस हजार रुपये रोख आणि पंच्याहत्तर हजारांची पुस्तके मिळणार आहेत. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पन्नास हजार रुपयांचे असून यामध्ये दहा हजार रुपये रोख आणि चाळीस हजारांची पुस्तके मिळणार आहेत. त्याचबरोबर वीस पारितोषिक उत्तेजनार्थ असून प्रत्येकी दोन हजारांची पुस्तके मिळणार आहेत.
या भव्य महानिबंध महास्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येकास दोन हजार रुपयांची पुस्तके आणि सहभागाचे प्रमाणपत्रही मिळणार आहे.
या राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेत प्रथम प्रवेश घेणाऱ्या फक्त पाचशे स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाणार असून प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 30 मार्च, 2026 आहे तर निबंध पाठवण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल, 2026 असून या स्पर्धेचा निकाल 30 जून, 2026 ला जाहीर केला जाणार असून बक्षीस वितरण 1 ऑगस्ट, 2026 रोजी करण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी नियम व अटी लागू असून निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती हवी असल्यास 07058479212 या व्हाट्सअँपच्या नंबरवर निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती पाठवा असा मेसेज पाठवावा किंवा मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, 873, क/2, सी वॉर्ड, सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड, उमा टॉकीज चौकाजवळ, सिद्धिविनायक मंदिरासमोर, कोल्हापूर-416002 या ठिकाणी प्रत्यक्ष भेटावे असे आव्हान आयोजक अंतिमा कोल्हापूरकर केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या