प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : क्रूरकर्मा टिपू सुलतान ने हिंदू स्त्रियांवर अत्याचार करून अनेक हिंदूंचे धर्मांतरण करण्याचं काम केलेलं आहे. टिपू सुलतान क्रूरकर्मा होता राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये टिपू सुलतान ची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होते. टिपू सुलतान चे फोटो क्रूरकर्मा औरंगजेबाच्या बरोबरीने मिरवणूक मध्ये नाचवले जातात सरकारने टिपू सुलतान च्या जयंती वर बंदी घातली असती तर तसेच क्रूरकर्मा टिपू सुलतान चे फोटो छापने व फोटो लावणे, मिरवणुकीमध्ये टिपू सुलतान चे फोटो नाचवण्यावर बंदी घातली असती तर मालेगाव मधील महापौर नसरीन बानो यांनी त्याच्या ऑफिसमध्ये इतर कोणत्याही महापुरुषांचे फोटो न लावता फक्त टिपू सुलतान चा फोटो लावला नसता.
तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी क्रूरकर्मा टिपू सुलतान ची तुलना अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आहे. *तरी सरकारने हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर शाब्दिक ताशेरे न ओढता व उत्तरास प्रतिउत्तर न देता सरकार खरंच कट्टर हिंदुत्ववादी असेल तर कृतीतून त्यांना उत्तर देऊन टिपू सुलतान च्या जयंती वर बंदी घालून, त्याचे फोटो छापण्यावर, मिरवणुकीमध्ये फोटो नाचण्यावर, चौकाला टिपू सुलतान चे नाव देण्यावर बंदी घालावी.* राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार हिंदुत्ववाद्यांनी -शिवभक्तानी निवडून देऊन यासाठीच सत्तेवर आणलेल आहे. अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने आम्ही करत आहोत.
हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे, दत्तात्रय भोकरे, सोमनाथ गोटखिंडे, पै. प्रदीप निकम, अनिरुध्द कुंभार, दिग्विजय शिंदे, अवधूत जाधव, राजू जाधव, शुभम गवळी, अनिकेत अबरुळे, अनिकेत कुंभार, अरविंद येतनाळे, गजानन माने.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या